अकोला

कोविड लसीकरणाचे उत्कृष्ट कार्य; ग्रामपंचायतींना पारितोषिक वितरण

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या विधवांनाही अर्थसहाय्य

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोविड लसीकरणाचे (COVID-19 vaccine) उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २४ ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर पारितोषिक वितरण बुधवारी करण्यात आले. कोविड लसीकरणामध्ये(Vaccination) ९० टक्केपेक्षा जास्त लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील (Akola District) २८६ ग्रामपंचायतीमधून ‘लकी ड्रा’ व्दारे जिल्हास्तरावरून तीन ग्रामपंचायतीना तर सात तालुकास्तरावरून प्रत्येकी तीन ग्रामपंचायतीना पारितोषिके देण्यात आले. या कार्यक्रमातच कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या विधवांनाही प्रत्येकी तीस हजार रुपयांच्या अर्थसहाय्याचे धनादेशही वितरीत करण्यात आले. (COVID-19 Vaccine Akola District)

जिल्हा नियोजन भवनातील छत्रपती सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी पार पडला. या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, माविमचे विभागीय संनियंत्रण अधिकारी केशव पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सह्याद्री फाऊंडेशनचे विजय क्षिरसागर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात अकोला तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस मारोडी ग्रा.प.(१०० टक्के), व्दितीय बक्षीस सुकळी नंदापूर ग्रा.प.(९७ टक्के), तृतीय बक्षीस गोणापूर ग्रा.प.(१०० टक्के), अकोट तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस देवरी ग्रा.प.(१२१ टक्के), व्दितीय बक्षीस सावरगाव (१२७ टक्के), तृतीय बक्षीस दिनोरी ग्रा.प.(१०२ टक्के), मूर्तिजापूर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस राजुरा घाटे ग्रा.प.(१३४ टक्के), व्दितीय बक्षीस गोरेगाव ग्रा.प.(१२३ टक्के), तृतीय बक्षीस अनभोरा ग्रा.प.(१३६ टक्के) यांना पुरस्कार देण्यात आले. तेल्हारा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस रानेगाव ग्रा.प.(१०० टक्के), व्दितीय बक्षीस सौदळा ग्रा.प.(९४ टक्के), तृतीय बक्षीस चांगलवाडी ग्रा.प.(१०४ टक्के). पातुर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस तांदळी बु. ग्रा.प.(९७.७९ टक्के), व्दितीय बक्षीस बेलुरा बु. ग्रा.प.(९८.७४ टक्के), तृतीय बक्षीस कार्ला ग्रा.प.(९५.४८ टक्के). बाळापूर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस झूरळ खु. ग्रा.प.(९५ टक्के), व्दितीय बक्षीस उरळ ग्रा.प.(१०१ टक्के), तृतीय बक्षीस शेळद ग्रा.प.(११८ टक्के). बार्शीटाकळी तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस उजळेश्वर ग्रा.प.(९१ टक्के), व्दितीय बक्षीस जांभरुण ग्रा.प.(९३ टक्के), तृतीय बक्षीस धाबा ग्रा.प.(१०० टक्के) वितरीत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT