Akola Women’s Hospital sakal
अकोला

Akola : दीड वर्षात सहा हजारांवर प्रसूती ‘नॉर्मल’,जिल्हा स्त्री रुग्णालयाची कामगिरी : नागरिकांचा वाचला खर्च

Akola : अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयाने दीड वर्षात तब्बल ६,८०३ महिलांची सामान्य प्रसूती यशस्वीपणे केली आहे. यामुळे अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचा सिझर प्रक्रियेवरील खर्च वाचला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : लेडीहार्डिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या तब्बल ६ हजार ८०३ गर्भवती महिलांची नॉर्मल प्रसूती झाली आहे. अकोल्यासह परिसरातील रुग्णांना जिल्हा स्त्री रुग्णालयाचा आधार मिळत आहे. सामान्य प्रसूतीमुळे हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांचा लाखोंचा खर्च वाचला आहे.

शहरात मोठा खर्चाचा भार सहन करीत ‘सिझरर’द्वारे होत असलेल्या प्रसूतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्त्री रुग्णालयाची कामगिरी सामन्य नागरिकांना दिलासा देणारी ठरत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी मिळणारी नागरिकांची पसंती लक्षणीय ठरत आहे. ग्रामीण भागात शासकीय आरोग्य व्यवस्थेबद्दलचा विश्वास वाढत असल्याचेच हे प्रतीक आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेले काम नागरिकांचा आरोग्य सेवेवरिल विश्र्वास वाढवित आहे. स्त्री रुग्णालयात झालेल्या प्रसूतीपैंकी बऱ्याच या मध्यरात्री वेळी झालेल्या आहेत.

प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदर मातांना व्यवस्थित तपासणीतून मानसिक आधार व हिंमत देण्याचे काम येथील महिला अधिकारी व कर्मचारी करत आहेत. सामान्य प्रसूतीमुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाचा सिझरसाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचला आहे.

आव्हानात्मक स्थितीत सिझर

गभावस्थेत शिशूचे वजन अधिक असल्यास सामान्य प्रसूती होणे अवघड असते. प्रसूतीदरम्यान जास्त वजनाच्या शिशूचे खांदे अडकण्याचा धोका असतो. तसेच मातेला उच्च रक्तदाब किंवा इतर कोणती आरोग्यविषयक समस्या असल्यास सामान्य प्रसूतीला अडचणी येतात. अशा आव्हानात्मक स्थितीत मातेचे ‘सिझर’ केले जाते.

परजिल्ह्यातील रुग्णांवरही उपचार

जिल्हा स्त्री रुग्णालयात आसपासच्या जिल्ह्यातूनही रुग्ण भरती होण्यासाठी येतात. शेजारील बुलडाणा, वाशिम, हिंगोली येथून महिला रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे रुग्णसेवेवर ताणही वाढतो. मात्र, सामान्य प्रसूतीचे वाढलेले प्रमाण पाहता नागरिक येथे उपचार घेण्यास पसंती देतात.

नॉर्मल प्रसूतींची संख्या

  • २०२३ ४ हजार ८६९

  • २०२४ १ हजार ९३४ (सप्टेंबर पर्यंत)

वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रयत्न

शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांवर वेळीच योग्य उपचार होत नाहीत, रुग्णांची काळजी घेतली जात नाही, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपलब्ध नसतात अशा अनेक गोष्टी नेहमीच कानावर येतात. मात्र, रुग्णसेवेला सर्वोतोपरी मानून जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी चांगली सेवा देण्यासाठी झटत असतात.

सामान्य प्रसूतीसाठी आधी सगळे प्रयत्न केले जातात. महिला अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे सामान्य प्रसूती करण्यासाठी अधिक प्रयत्न असतात. दीड वर्षात सहा हजार ९०० मातांच्या प्रसूती सामान्य झाल्या आहेत.

-डॉ. जयंत पाटील, अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT