over kanwar yatra in shravan changes in traffic know the alternative route akola Sakal
अकोला

Kanwar Yatra : कावड यात्रा उत्सवाच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल; हे आहेत पर्याची मार्ग

जिल्हाधिकारी अजित कुंभार : नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : श्रावणातील प्रत्येक, तसेच शेवटच्या सोमवारी शहरात मोठ्या प्रमाणावर आयोजित कावड यात्रा लक्षात घेऊन अकोला-अकोट राज्य महामार्ग व दर्यापूर मार्गावरील, तसेच शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

श्रावणातील शेवटच्या सोमवारी शहरात मोठ्या प्रमाणावर कावड यात्रा असते. यंदा २ सप्टेंबरला शेवटचा श्रावण सोमवार आहे. यात्रेच्या एक दिवस आधी मोठ्या संख्येने शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन मध्यरात्रीनंतर पायदळ कावड यात्रेद्वारे श्री राजराजेश्वर मंदिराकडे निघण्यास सुरूवात होते.

त्यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवू शकते. ही बाब लक्षात घेता रहदारी व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक यांनी प्रस्तावित केल्यानुसार जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी कावड यात्रा उत्सवाच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल केला आहे.

पर्याची मार्गाने वाहतूक व्यवस्था

११ व १८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजतापासून ते दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत व कावड-पालखी मिरवणूक मार्गावरील वाहतूक रात्री ८ वाजतापासून ते दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.

त्याचप्रमाणे, २५ ऑगस्ट व १ सप्टेंबरच्या दुपारी १२ वाजतापासून दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत व शहरातील कावड, पालखी मिरवणूक मार्गावरील वाहतूक रात्री ८ वाजतापासून दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

असा असेल बदल

  • अकोला-अकोट तसेच दर्यापूर मार्गावरील बदल : बस स्थानक, रेल्वे स्टेशन, आपातापा चौक, गांधीग्राम मार्गे अकोटकडे जाणारी वाहतूक व अकोट ते अकोलाकडे याच मार्गाने येणारी वाहतूक पर्यायी मार्ग बस स्थानक, अशोक वाटिका, जेल चौक, वाशीम बायपास, शेगाव टी-पॉईंट, गायगाव, निंबा फाटा, देवरी-अकोट. तसेच अकोट ते अकोला येणारी सर्व प्रकारची वाहतूक याच मार्गाने वळविण्यात येईल.

  • अकोला बस स्थानक, रेल्‍वे स्थानक, आपातापा चौक, म्हैसांग मार्गे दर्यापूर व दर्यापूर ते अकोल्याकडे याच मार्गाने येणारी वाहतूक पर्यायी मार्ग अकोला बसस्थानक, टॉवर चौक, न्यायालय मेन गेटकडून सातव चौक, बिर्ला राममंदिर रेल्वे गेट, न्यू तापडिया नगर, खरप टी-पॉईंट, म्हैसांग मार्गे दर्यापूर, तसेच दर्यापूर ते अकोल्याकडे येणारी सर्व वाहतूक याच मार्गाने वळविण्यात येईल.

  • शहरातील मिरवणूक मार्गावरील वाहतूक : रेल्वे स्थानक चौक ते रेल्वे पूल, अकोट स्टँड ते बियाणी चौक, लक्झरी बस स्थानक, वाशीम बायपासकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्ग रेल्वे स्थानक चौक, नवीन उड्डाण पुलावरून जेल चौक, वाशीम बायपासकडे वळविण्यात येईल.

  • नवीन बसस्थानकाकडून गांधी चौक, कोतवाली चौक, जयहिंद चौक, डाबकी रोड तसेच हरिहरपेठ कडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्ग नवीन बसस्थानक, जेल चौक, वाशीम बायपास चौक, हरिहरपेठ, डाबकी रस्त्याकडे वळविण्यात येईल.

  • डाबकी रोड, श्रीवास्तव चौक, जयहिंद चौक ते बस स्थानक, तसेच डाबकी रोड, दगडी पूल, मामा बेकरीकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्ग डाबकी रोड, भांडपुरा चौक, हरिहरपेठ, वाशीम बायपास चौक, शासकीय बगिचा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून अशोक वाटिका चौक बसस्थानकाकडे वळविण्यात येईल.

  • लक्झरी बस स्थानक, शासकीय बगीचा, टिळक रस्ता, अकोट स्टँड, रेल्वे स्थानकाकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्ग लक्झरी बस स्थानक, नव्या उड्डाण पुलावरून अग्रसेन चौक, रेल्वेस्थानक चौकाकडे वळविण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT