The pair of revenue employees is known in the taluka as Property Brokers  
अकोला

महसूल विभागाची जोडी बनली ‘प्रॉपर्टी ब्रोकर’; कार्यालयाला दांड्या देऊन भूखंड सौद्यामध्ये मग्न

सदानंद खारोडे

तेल्हारा (अकोला) : तेल्हारा तहसील कार्यालयात कार्यरत असणारे दोन कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयाला दांडी देत भूखंडाच्या खरेदी विक्रीचे सौदे घडवून आणण्यात मग्न आहेत. ही महसूल कर्मचाऱ्यांची जोडी तालुक्यात ‘प्रॉपर्टी ब्रोकर’ म्हणून प्रसिद्ध आहे.

तेल्हारा तहसीलचे प्रभारी तहसीलदार राजेश गुरव यांनी अवैध्य वाळू तस्करच्या विरोधात मोहीम उघडली आहे. अनेक कारवाया करत लाखो रुपयांचा महसूल वसूल केला. त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडत अवैध वाळू तस्करांमध्ये दहशत निर्माण केली आहे. दुसरीकडे त्यांची प्रशासकीय कामावरील पकड सैल झाली असल्याचे चित्र आहे. कार्यालयात कर्तव्यावर असणारे दोन कर्मचारी कार्यालयीन वेळेत हलचल बुकावर कुठलीही नोंद न करता, रजेचा अर्ज न टाकता कार्यालयाला दांड्या मारत आहेत. लोकांच्या विक्रीस असलेली शेती, प्लॉट, इमारती पाहण्यात व त्यासाठी ग्राहक शोधण्यात हे कर्मचारी मग्न आहेत. कमी दरात खरेदी केलेली मालमत्ता विक्रीचे सौदे करून व जास्त भाव मिळवित कमिशन लाटण्याचे काम ही जोडी कार्यालयीन वेळेत खुलेआम करताना दिसत आहे.

बदली होऊनही तेल्हाऱ्यातच तळ

तहसील कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांची दीड वर्षापूर्वी बदली झाली आहे. त्यानंतरही हे दोन्ही कर्मचारी तेल्हारा तहसीलमध्ये तळ ठोकून बसले आहेत. एकीकडे शासनाकडून हे कर्मचारी वेतन घेत असून, दुसरीकडे प्रॉपर्टी डीलिंगमध्ये लाखोंचे कमिशन जमा करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, तहसीलदारही त्यांच्या कार्यालयातील या दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत नसल्याने अकेन उलटसुलट चर्चेला उत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT