PM surya ghar scheme sakal
अकोला

PM Surya Ghar Scheme : पीएम सूर्यघर योजनेचा लाभ! घराच्या छतावर वीजनिर्मिती करून ग्राहक झाले स्वावलंबी

PM Surya Ghar Scheme : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला पश्चिम विदर्भात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला पश्चिम विदर्भात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत पश्चिम विदर्भाच्या पाचही जिल्ह्यातील सहा हजार २७४ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वत:ची वीज स्वत: तयार करण्यास सुरूवात केली आहे. पर्यायाने ते विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत.

या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान दोन किलोवॅटपर्यंत मिळते. तीन किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते.

तीन किलावॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरिता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट इतकी आहे.

महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रुफटॉप बसवणाऱ्या एजन्सीजसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे.

या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे.

महावितरणकडून आवश्यक तांत्रिक सहकार्य

प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेत छतावर सोलर बसविलेल्या पश्चिम विदर्भातील जिल्हानिहाय ग्राहकामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे दोन हजार ८९४ ग्राहकाचा समावेश आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यातील एक हजार २०६, बुलडाणा ९९२, यवतमाळ ८२१ आणि वाशीम जिल्ह्यातील ३६१ ग्राहकाचा समावेश आहे. वीज ग्राहकांना घराच्या छतावर सौर प्रकल्प बसविण्यासाठी महावितरणकडून आवश्यक तांत्रिक सहकार्य करण्यात येत असून, पश्चिम विदर्भातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार? म्हणते, "महाराष्ट्रावर प्रेम नसतं तर..."

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ, श्रेयस आणि व्यंकटेश अय्यर या लिलावातील महागडे खेळाडू! कॉनवेची चेन्नईत घरवापसी, तर वॉर्नर-पडिक्कल अनसोल्ड

SCROLL FOR NEXT