political Poster war over Ladaki Bahin Yojana in Karanja Assembly constituency Sakal
अकोला

Karanja Assembly constituency : कारंजा विधानसभा मतदारसंघात लाडकी बहीण योजनेवरून पोस्टर वॉर

सकाळ वृत्तसेवा

- अनंत सुपनर

कारंजा : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सध्या कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघात पोस्टर वॉर सुरू आहे. शहरात व गावोगावी ज्ञायक पाटणी व राजू पाटील राजे यांचे लाडकी बहीण योजनेची माहिती देणारे मोठमोठे फ्लेक्स लागले आहेत. या फ्लेक्समुळे नागरिकांचे मात्र मनोरंजन होताना दिसत आहे.

आगामी कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून मतदार संघात पोस्टर वॉर रंगत असल्याचे पहायला मिळत असून भाजपातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येत आहे. पक्ष घराणेशाही जपतो की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे .

कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघ २००८-०९ मध्ये तयार झाला. २००९ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत स्थानिक उमेदवार दिवंगत प्रकाश डहाके यांचे रुपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून विधानसभेत पोहचले.

२०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे दिवंगत राजेंद्र पाटणी यांना दोनवेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. स्व. प्रकाश डहाके व स्व. राजेन्द्र पाटणी यांचे निधनाने पोरक्या झालेल्या या मतदार संघावर अनेक इच्छुकांचा डोळा आहे. स्थानिकांपेक्षा बाहेरच्यांचीच धुम सुरू आहे. रोगनिदान शिबिरे, मेळावे, व्याख्याने या माध्यमातून मतदारांना वळविण्याचे जोरकस प्रयत्न केले जात आहेत.

भाजपकडून दिवंगत आमदार राजेन्द्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी हे वडिलांच्या मृत्यूपश्चात मतदार संघात फिरून नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधत आहेत. त्यांच्या पाठीमागे त्यांचे सासरे तथा भाजपचे कारंजा शहराध्यक्ष ललितसेठ चांडक भक्कमपणे उभे आहेत.

दुसरीकडे भाजपाचे वाशीम जिल्हयातील बिनीचे शिलेदार राजू पाटील राजे यांना पक्षाने कारंजा- मानोरा मतदार संघात तयारीला लागा अशी सूचना दिल्याचे सुत्रांची माहिती आहे. तसा दुजोरा राजू पाटील राजे यांनी कारंजा तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयास भेट दिली असता दिला असून लवकरच कारंजात घर घेऊन मतदार संघ पिंजून काढणार असल्याचे स्पष्ट केले.

या दोघांव्यतिरिक्त तालुकाध्यक्ष डॉ.राजू काळे, माजी नगराध्यक्ष नरेन्द्र गोलेच्छा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अवर सचिव अमोल पाटणकर हे सुद्धा भाजपकडून निवडणुकीकरिता इच्छुक आहेत.

तालुक्यात दोन गट

लोकसभा निवडणूकीतील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांचे प्रचारार्थ वाशीम येथे झालेल्या सभेत व्यासपीठावर ज्ञायक पाटणी व राजू पाटील राजे यांच्यात मंत्र्यांच्या समोरच खुर्चीवर बसण्यावरून झालेला वाद सर्वश्रुत आहे. तेव्हापासूनच भाजपाचे तालुक्यात दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. पक्षात उफाळलेली अंतर्गत गटबाजी कोणत्या वळणावर जाऊन थांबते की उसंडी घेते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोणाला मिळणार उमेदवारी

दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वडिलांची पुण्याई, विकासकामे व कार्यकर्त्यांची फळी ही ज्ञायक पाटणी यांची जमेची बाजू असली तरी राजू पाटील राजे यांचाही चाहता वर्ग या मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.

जातीय समीकरणात राजू पाटील यांची बाजू भक्कम आहे. दिवंगत आमदार राजेन्द्र पाटणी यांचे सोबतचे बरेचसे पदाधिकारी, कार्यकर्ते राजू पाटील राजे यांचे सोबत असल्याचे पहायला मिळत आहे.

गेम चेंजर उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात

कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छूकांची नावे समोर येत असले तरी इलेक्शन गेम चेंजर उमेदवारी चेहरा अद्यापही गुलदस्त्यात आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गुलदस्त्यातील हे नांव अचानक समोर येऊ शकते पण महायुती की महाविकास आघाडीकडून हे सांगता येत नाही. ते नाव समोर येताच अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फिरणार आहे एवढे मात्र निश्चित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT