Post Office Scheme sakal
अकोला

Post Office Schemes : पोस्टाच्या खात्यावर आता मोठ्या रकमेचे व्यवहार,पोस्ट-आयपीपीबीचे खाते करा लिंक

Post Office Schemes : पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी आता नव्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. आयपीपीबी खात्यासोबत लिंक केल्यानंतर ग्राहक सहजपणे २ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतात.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना मोठ्या रकमेचे व्यवहार करताना आतापर्यंत अडचणी येत होत्या. पोस्टाकडून मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यात येणारी अडचण दूर करण्यात आली आहे. उपलब्ध झालेल्या नव्या सुविधेमुळे मोठ्या रकमेचे व्यवहार करता येणार आहेत. त्यासाठी पोस्ट ऑफिस आणि भारतीय पोस्ट पेमेंट बँकेतील (आयपीपीबी) खाते लिंक केल्यानंतर ग्राहकांना मोठ्या रकमेचे व्यवहार करता येणार आहेत.

पोस्ट आणि आयपीपीबीत खाते असणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांची पोस्टात खाती आहेत. मात्र, ऑनलाईन सेवा उपलब्ध नसल्याने मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी ग्राहकांना आतापर्यंत नजीकच्या टपाल कार्यालयात जावे लागत होते. अडीअडचणीला तातडीने पैसे मिळत नव्हते. मात्र, आता ही समस्या दूर झाली आहे. आयपीपीबीत खाते असणाऱ्यांना बँकेचे ॲप डाऊनलोड करावे लागेल आणि पोस्टाचे अकाउंट त्यासोबत लिंक करावे, पोस्टाच्या खात्यावरील व्यवहाराची मर्यादा सध्या २५ हजार रुपये आहे. मात्र, आयपीपीबी ॲपद्वारे ग्राहक दोन लाख रुपयांपर्यंतचा व्यवहार करू शकतात, पोस्टाच्या कार्यालयातूनही आयपीपीबीत खाते उघडता येते. आधार पडताळणीसह तीन मिनिटांत ही प्रक्रिया पार पडते.

आयपीपीबी ॲपवर सुविधा

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिक आयपीपीबीत खाते उघडतात. आयपीपीबी ॲपद्वारे ग्राहकांना इतर कोणत्याही बँकेच्या खात्यावर पैसे पाठविता येतात. ऑनलाईन पेमेंट, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातही ग्राहक या माध्यमातून रक्कम जमा करू शकतात. शिवाय, पोस्ट आणि आयपीपीबी खात्यावर झालेल्या व्यवहारांचा तपशीलही ग्राहकांना ॲपवर पाहता येतो.

लाडक्या बहिणींचा कल वाढला

लाडकी बहिण योजनेतून दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. ही योजना सुरु झाल्यानंतर पोस्टात खाते उघडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महिलांनी गत दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात पोस्ट पेमेंट बॅंकेत खाते उघडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT