Prakash Ambedkar sakal
अकोला

Prakash Ambedkar: मनोज जरांगे पाटलांना शरद पवारांनी उभं केलय; ओबीसी उमेदवारालाच मतदान करा

Manoj Jarange Patil : पाटील हे शरद पवारांनी उभे केले असल्याचा खुलासा ॲड. आंबेडकरांनी केला : Prakash Ambedkar Criticizes Manoj Jarange Patil and Sharad Pawar Over Maratha Reservation Demand

योगेश फरपट

Akola Latest Update: सरकारकडून ओबीसींच्या आरक्षणाच खेळ चालवला जात आहे. म्हणून ओबीसी जनतेने सावध भूमिका घेत ओबीसी उमेदवारालाच मतदान करावे असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आलेली एससी, एसटी, ओबीसी आरक्षण बचाव रॅली सोमवारी दुपारी जिल्हयात दाखल झाली. यावेळी अकोल्यातील टॉवर चौकात आयोजित सभेत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केंद्र व राज्य सरकारच्या कुटील भूमिकेचा खरपुस समाचार घेतला.

ठाकरे व शिंदेबाबतीत आंबेडकर म्हणाले, शिवसेना ठाकरे गटाचा मतदार हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेला. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहिला, तर काँग्रेसचा मतदार हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळाला. त्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून आले असा दावा केला.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आंबेडकर यांना बेचेन झाल्याचा आरोप केला होता. त्यावर अरविंद सावंत यांना ‘थँकु व्हेरी मच’ असा टोला लगावला. राज्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांनी उभे केले असल्याचा खुलासा ॲड. आंबेडकरांनी केला.

अकोल्यात स्वागत

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या आरक्षण बचाव रॅलीचे अकोला जिल्ह्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आले. एससी, एसटी, ओबीसी आरक्षण बचाव रॅली जिल्हयातील लाखपुरी या गावात पोहोचल्यानंतर या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले.

त्यानंतर आंबेडकरांनी राधा मंगलम मुर्तीजापुर येथे ओबीसी, एससी, एसटी बांधवांना संबोधित केले. त्यानंतर रॅली अकोल्याकडे रवाना झाली. अकोल्यात टॉवर चौकात वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला ॲड. आंबेडकरांनी संबोधित केले. त्यानंतर रॅली पातुरकडे रवाना झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT