Provide financial package for loss-affected farmers Bhavna Gawli 
अकोला

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज द्या : गवळी

हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली तर शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत

सकाळ वृत्तसेवा

वाशीम - मागील आठवड्यात संपूर्ण विदर्भासह यवतमाळ-वाशीम मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पुर गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली तर शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. ग्रामीण भागत मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाल्याने गरीब कुटुंब उघड्यावर आली आहेत. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून एका पत्राव्दारे केली आहे.

खासदार गवळी यांनी पत्रात पुढे म्हटले की, मागील एक महिन्यापासून कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस सुरु आहे. अशातच ७ ऑगस्ट ते ९ ऑगस्टपर्यंत सर्वत्र अतिवृष्टी झाली असून पावसाने सरासरी ओलांडली़ असून संपूर्ण प्रकल्प ओव्हर फ्लो झाले. शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली आली तर जमीनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. यामुळे संपूर्ण शेतकरी हवालदिल झाला असल्याचे विदारक चित्र आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून यावर शेतकरी विसंबून आहे. मात्र, मागील काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीपासून शाश्वत उत्पादनाची हमी उरली नाही. तरीही यंदा हवामान विभागाने मुबलक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने उधार उसनवार करून खरिप हंगामात पेरणी केली़. परंतू हवामान विभागाचा अंदाज चुकवत वेळीअवेळी झालेल्या पाऊस व बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले.

या संकटानंतर शेतात बियाणे उगवल्याने शेतकरी आनंदून गेला असताना मागील पंधरवड्यातील पावसाच्या तांडवात शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या हंगामात उत्पादनाची आशा मावळल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला़. निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी मायबाप सरकारकडून मदतीची आस लावून बसला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाकडून तातडीने सर्वेक्षण करावे व विशेष बाब म्हणून आर्थिक पॅकेज जाहीर करून तातडीने आर्थिक मदत देण्याची आग्रही मागणी खा़. भावना गवळी यांनी दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Corporation: दोन देशमुखांमध्ये देवेंद्र कोठेंची एन्ट्री; महापालिकेत भाजपच्या साथीने शिवसेना- राष्ट्रवादीची पहिली लढाई

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर गेलेच नाहीत, राजकीय चर्चा खोट्या

Mumbai Vada Pav: मुंबईचा 'वडापाव' खिशाला परवणारा नाही राहिला, इतका महाग झाला; पण, का अन् कसा?

IPL Auction: श्रेयस अय्यरला तर सोडलं, पण आता KKR चा कर्णधार कोण? रहाणे-डी कॉकचा पर्याय पण...

Vaibhav Suryavanshi : राजस्थानने 1.10cr मोजले, पण १३ वर्षीय खेळाडूला IPL 2025 खेळता येणार नाही? नियम काय सांगतो वाचा

SCROLL FOR NEXT