अकोला : सुमारे १५० कोटी रूपयांच्या निधीतून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले. मात्र, या रुग्णालयात अद्याप मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले नाही. दरम्यान, आता मंजूर असलेल्या कंत्राटी ८६ पदांच्या भरतीसाठी मेमर्स स्मार्ट सर्विसेस कंपनीला कंत्राट देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण नोकरभरतीची प्रक्रिया रखडलेली आहे. २०० बेड्स क्षमतेच्या या रूग्णालयाचा नागरिकांना कोणताही उपयोग होत नव्हता. सन २०१४ मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने केंद्राच्या मदतीने राज्यात चार सुपरस्पेशालिटी रूग्णालये उभारण्याची घोषणा केली होती. यात विदर्भ आणि मराठवाड्याला प्रत्येकी दोन रूग्णालये मिळाली होती. यामध्ये अकोल्यातील सुपरस्पेशालिटी रूग्णालयाचा समावेश करण्यात आला होता.
या रूग्णालयाचे बांधकाम २०२९ मध्ये पूर्ण झाले होते. मात्र, मनुष्यबळाअभावी या रूग्णालयाचा नागरिकांना कोणताही उपयोग होत नव्हता. दरम्यान, आता कंत्राटी पद्धतीने ८६ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ७ तृतीय व इतर चतुर्थ श्रेणीच्या पदांचा समावेश आहे.
ही पदभरती मेमर्स स्मार्ट सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीकडून होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मीनाक्षी गजभिये यांनी कंपनीला पत्र दिले असून लवकरात लवकर कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात यावे, असे पत्रात नमुद आहे.
आरोग्यसेवेवरील ताण कमी होणार
अकोला हे पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. अकोल्यासह यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील रूग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात येत असतात. यामुळे सर्वोपचार रूग्णालयावर आरोग्यसेवेचा मोठा ताण येतो. सुपरस्पेशालिटी रूग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर रूग्णसेवेवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.