The revenue team has received information that some tractors are extracting illegal sand from the Purna river basin.jpg 
अकोला

महसूल पथकाचे 'लोकेशन' मिळताच वाळू तस्कर पळाले; अन् तहसीलदारांच्या हाती लागले फावडे व घमेले

अनिल दंदी

बाळापूर (अकोला) : सकाळी नऊ वाजताची वेळ. महसूल विभागाची गाडी निंबा गावात पोहचली. मात्र पथक नदीपात्रात पोहोचण्यापूर्वीच वाळू तस्करांनी पोबारा केला. अन पथकाच्या हाती लागले फावडे आणि घमेले. 

निंबा शिवारातील मन नदीपात्रात अवैध वाळूचा उपसा करीत असलेल्या वाहनांना पकडण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाचे 'लोकेशन ' पथक दाखल होण्यापूर्वीच वाळू तस्करांना मिळाल्याने तस्कर नदीपात्रातून पळून गेले. ही घटना शनिवारी निंबा परिसरात घडली आहे. मात्र या पथकाच्या हाताला फावडे व घमेले हे उत्खनन करण्याचे साहित्यच हाती लागल्याने अखेर महसूलच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.

दानापूर येथील स्मशानभूमी बनली पर्यटन स्थळ, 75 वर्षावरील वयोवृद्धांनी घडवली क्रांती
 
तालुक्यातील डोंगरगाव, हाता, निंबा, लोहारा, अंदुरा आदी परिसरातून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसाचा गोरख धंदा सुरू आहे. त्याला लगाम लावण्यासाठी बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी पथक स्थापन केले. मात्र हे पथक नदीपात्रात दाखल होण्यापूर्वीच पथकाची माहिती तस्करांना मिळत असल्याने वाळू माफिया पळून जाण्यात यशस्वी होत आहेत. 

एसडीएम डॉ. रामेश्वर पुरी यांनी राष्ट्रीय महामार्गावरुन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत लाखो रुपये किमतीची वाळू जप्त केली आहे. त्यामुळे महामार्गावरुन वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परंतु असे असले तरी लोहारा, निंबा परीसरातील नदीपात्रातून दररोज दहा ते बारा वाहने वाळुची राजरोसपणे वाहतूक करीत आहेत. 

त्यासाठी महसूल विभागाचे एक पथक स्थापन करण्यात आले आहे. आज पूर्णा नदीच्या पात्रातून काही ट्रॅक्टर अवैध वाळूचा उपसा करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून स्वतः बाळापूर तहसीलदार डि. एल. मुकुंदे, मंडळ अधिकारी विजय तेलगोटे, दिपक सोळंके, गजानन भागवत, पि एम नाकट व खराटे हे नदीपात्रातील पकडण्यासाठी गेले. मात्र तहसीलची गाडी निंबा गावात धडकताच वाळू माफियांना याची माहिती मिळाली अन नदीपात्रात चांगलीच तारांबळ उडाली. व तस्करांनी उत्खननासाठी आणलेले फावडे व घमेले तेथेच ठेवून वाहनांसह पळ काढला. त्यामुळे या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. 

बाळापूर तहसीलदार डि एल मुकुंदे व त्यांचे पथक वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या उद्देशाने नदीपात्रात गेले असताना पथक पोहोचण्यापुर्वीच वाळू तस्करांनी पळ काढला. त्यामुळे रिकाम्या हाताने परतावे लागले. 
- दिपक सोळंके, मंडळ अधिकारी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT