वनोजा ः मंगरुळपीर तालुक्यातील आदर्शग्राम वनोजा येथून नागपूर ते मुंबई ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ समृद्धी महामार्ग गेलेला असून, या महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, समृद्धी महामार्गाचा रस्ता जमिनीपासून उंचीवर आहे तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला सरंक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पांदण रस्ते बंद झालेत व महामार्गाच्या पलीकडे शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यांना रस्ता नसल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी पांदण रस्ते खुले करण्यासाठी अनेक ठिकाणी निवेदने दिली मात्र, अजूनही प्रश्न सुटलेला नाही. (Roads closed due to Samrudhi Highway)
समृद्धी महामार्गामुळे शेतात जाणारे पांदण रस्ते बंद झाल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी व शेतातील कामे करण्यासाठी बैल-औत तसेच ट्रॅक्टर व इतर वाहने नेण्यासाठी रस्ताच उरला नाही. शेतकऱ्यांना शेती संबंधित कामे करताना अडचणी येत असल्याने वनोजा येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. समृद्धी महामार्ग वनोजा येथून भाग १ व २ शेतशिवारामधून गेला आहे. वनोजा गावच्या दक्षिण दिशेस जाणारे, वनोजा ते नागी, वनोजा ते शेलुबाजार, वनोजा ते येडशी असे तीन पांदण रस्ते होते. याच पांदण रस्त्यांचा वापर शेतकरी शेतातील वहीती करण्यास व ये- जा करण्यासाठी करत होते. परंतु, समृद्धी महामार्गाच्या उंचीमुळे हे सर्व पांदण रस्ते बंद झाले आहेत.
शेतकऱ्यांना दुसरा कुठलाही पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने शेती करणे अशक्य झाले आहे. शेतकऱ्यांनी ही बाब आमदार लखन मलिक यांच्यासोबत चर्चा करून निदर्शनास आणून दिले व पांदण रस्ते बंद झाल्यामुळे येणाऱ्या अडचणी सांगितल्या. शेतकऱ्यांचा पांदण रस्त्याच्या प्रश्न लवकरच सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे यावेळी आमदार लखन मलिक यांनी सांगितले. या पांदण रस्त्याचा प्रश्न न मिटल्यास वनोजा येथील असंख्य शेतकरी व शेतमजूर कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. कुटूंबाचे पालन पोषण करण्यासाठी शेती करणे आवश्यक असल्यामुळे शेतात ये जा करण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करावा, अशी मागणी वनोजा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रसंगी नागेंद्र राऊत, सुरेश राऊत, गंगादीप राऊत, अक्षय राऊत, तुळशीराम काळे, गोपाल राऊत, सचिन राणे उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित ठेकेदार, अधिकारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बोलून लवकरात लवकर शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.
- लखन मलिक, आमदार, वाशीम-मंगरुळपीर मतदारसंघ
संपादन - विवेक मेतकर
Roads closed due to Samrudhi Highway
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.