मालेगाव (जि.वाशीम) ः समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) कळंबेशवर कॅम्पवर (Kalambeshwar Camp) १०-१२ जणांनी चौकीदाराला मारून १ लाख २० हजारांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची घटना घडली. पोलिसांनी संशयित सात जणांच्या जणांच्या घरातून एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांना अटक केली आहे. उर्वरित दरोडेखोर फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. गत एक महिन्यापासून समृद्धी महामार्ग कॅम्प कळंबेश्वर क्र.२४३ येथे चौकीदारीचे काम करणाऱ्या फिर्यादी विश्वसम्राट वानखडे यांनी पो.स्टे.ला माहिती दिली की, समृद्धी महामार्गाचे काम मुंगळा आणि कळंबेश्वर गावाचे मधात सुरू आहे. साईट क्र. २४३ चे जवळचे पुलाचे काम सुरू असून, त्याकरीता मोठ्या मशीन, लाईट, वेल्डींग मशीन, चाँशी मशीन व इतर लोखंडी साहित्य टिनपत्र्याच्या खोलीत ठेवले आहे. (Robbery at Samrudhi Highway camp at Washim Malegaon, property in seven houses)
फिर्यादी आणि त्याचे सोबत नवीन ठाकूर अशा दोघाना सोमवारी (ता.३१) रात्री साडेअकरा वाजताच्या दरम्यान १०-१२ चोरट्यांनी मारहाण करून त्याठिकाणा वरून कॉकरीट, व्हायबरेटर मशीन तिन नग, तार कापण्याची मशीन ४ नग, वेल्डींग मशीन, डिझेली ६० लीटर, टिनपत्रे, असा एकूण १ लाख २० हजार रुपयाचा माल चोरून नेल्याची फिर्याद विश्वसम्राट वानखडे यांनी दिला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितवरून गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याकरिता कळंबेवर व मुंगळा गावामध्ये शोध मोहीम राबविली असता, जगदीश उर्फ भारत कुंडलीक वानखडे, गणेश दौलत महाजन, सुखदेव दगडू शिंदे, गजानन दगडू शिंदे, संतोष रतन शिंदे, बाळू भगवान धनदर, दिलीप बंशी काळे यांचे घरा मधून गुन्ह्यात चोरी गेलेला एक लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पैकी जगदीश उर्फ भारत कुंडलीक वानखडे व गणेश दौलत महाजन यांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी फरार झाले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनामध्ये पो.नि.आधारसिंग सोनोने, पोउपनि. महल्ले, पोहेकॉ. कोकाटे, पोहेकॉ. ढेंगळे, नापोकॉ. गजानन काळे, नापोकॉ. गजानन झगरे, पोकॉ.नवल चरावंडे, पोकॉ.मोघाड, पोकॉ.गोपनारायण, मपोकॉ. वैशली तायडे, नापोकॉ.संदीप निखाडे, नापोकॉ.प्रशांत वाढणकर, पोकॉ.नारायण सरकटे, पोकॉ. किल्लेकर यांनी केली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
संपादन - विवेक मेतकर
Robbery at Samrudhi Highway camp at Washim Malegaon, property in seven houses
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.