अकोला : पर्यावरणाचा बिघडलेला समतोल व वाढते तापमान यावर वृक्ष लागवड हाच एक पर्याय आहे. हे लक्षात घेवून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या ‘ग्रीन डे’ निमित्त जिल्हाभर देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
वृक्षरोपनानंतर ‘सकाळ’च्या सामाजिक उपक्रमात सहभागी होत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी वृक्ष संगोपनासाठी पालकत्व स्वीकारले. या उपक्रमासाठी पर्यावरण मित्र विवेक पारसकर यांच्या ग्रीन ब्रिगेडने विशेष सहकार्य केले.
‘सकाळ माध्यम समूह’ अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष रोपण व संवर्धनात पुढाकार घेत आहे. वृक्ष संवर्धनासाठी ‘ग्रीन डे’ ही संकल्पना ‘सकाळ’ राबवीत आहे. याच पार्श्र्वभूमीवर बुधवारी (ता.५) ‘सकाळ ग्रीन डे’ निमित्त अकोल शहर व जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
माजी नगरसेविका उषा विरक व मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाचे सचिव अनिल तापडिया यांच्या उपस्थितीत मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून ‘सकाळ ग्रीन डे’च्या वृक्षारोपण उपक्रमाची सुरुवात केली.
यावेळी शाळेच्या मुख्याधिपीका ममता चावला, प्रभारी प्राचार्या पूनम चव्हाण, संजय आगासे, शिक्षिका नीलिमा कांबळे, माया पुराणीक, देवयाणी शर्मा, निकिता गिरम आदींची उपस्थिती होती.
त्यानंतर पातूर रोडवरील प्रभात किड्स डे बोर्डिंग स्कूल येथे संस्थापक संचालक डॉ. गजानन नारे व शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून सकाळच्या उपक्रमात सहभाग घेतला.
नोएल इंग्लिस स्कूल येथे ग्रीन ब्रिगेडचे संस्थापक पर्यावरण मित्र विवेक पारसकर यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक मंगेश काळे, नोएलच्या संस्थापक सुरेखा मनवर, संचालक अनोष मनवर, अपर्णा डोंगरे,
अनुल मनवर यांच्यासह मानव नॉलेज सिटीचे संचालक मनोज महाजन, केदार खरे, प्रमोद धर्माळे, अविनाश मोरे, निळू भाऊ, ग्रीन ब्रिगेडचे अनिल माहोरे, निशिकांत बडगे व नोएलच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.
याशिवाय ज्योती जानोळकर विद्यालय, समर्थ पब्लिक स्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर, जय बजरंग विद्यालय कुंभारी येथेही विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळ ग्रीन डेच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.
स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे प्राचार्या मनिषा उंबरकर, प्रशासकीय अधिकारी ॲड. सुमित बोकाडे,क्रीडा विभाग प्रमुख राजेंद्र डोंगरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. स्व.ज्योती जानोळकर विद्यालयामध्ये संस्थेचे सचिव व प्राचार्या प्रशांत जानोळकर, संचालिका स्मीता जानोळकर, प्राचार्य राजाराम गायकवाड आदींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.
‘समर्थ’च्या विद्यार्थ्यांनी घेतली वृक्षसंवर्धनाची शपथ
सकाळ माध्यम समुहातर्फे आयोजित ग्रीन डे निमित्ताने बुधवारी समर्थ पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांनी वृक्षसंंवर्धानाची शपथ घेत वृक्षारोपण केले. समर्थच्या प्राचार्य गुप्ता मॅडम यांच्यासह शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.
ग्रीन ब्रिगेडचा सक्रिय सहभाग
सकाळ माध्यम समुहातर्फे आयोजित ग्रीन डेच्या उपक्रमात पर्यावरण मित्र विवेक पारसकर यांच्या ग्रीन ब्रिगेडने सक्रिय सहभाग घेतला. ग्रीन ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण उपक्रमासाठी ५०० रोपं उपलब्ध करून दिले. सोबतच वृक्षारोपण उपक्रमातही विवेक पारसकर, अनिल माहोरे, निशिकांत बडगे व इतर पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.