Sant Sri Gajanan Maharaj palakhi entered Akola  Sakal
अकोला

Sant Sri Gajanan Maharaj Palakhi : माऊली निघाले पंढरपुरा... मुखाने विठ्ठल-विठ्ठल बोला...!

श्री श्रेत्र शेगावीच्या राणाचे अकोला जिल्ह्यात स्वागत

अनिल दंदी

बाळापूर : टाळ-मृदुंगाचा गजर..., भजन-कीर्तनाचा गगनभेदी निनाद..., संतांच्या ओव्या-भारुडे आणि विठूनामाच्या गजराच्या भक्तीत तल्लीन होत सातशेहून अधिक वारकऱ्यांसह राज वैभवी थाटात संत श्री गजानन महाराजांची पालखी गुरुवारी (ता. १३) जून रोजी अकोला जिल्ह्यात दाखल झाली.

लाडक्या विठुरायाच्या भेटीची आस मनात धरून पंढरपूरच्या वाटेने निघालेल्या श्री महाराजांच्या पालखीचे बाळापूर व शेगाव तालुक्याच्या सीमेवर जंगी स्वागत करण्यात आले. श्री संतनगरी शेगाव येथून आज गुरुवारी (ता. १३) जून रोजी सकाळी ७५० वारकरी भक्तांसंगे मार्गस्थ झालेला श्री माऊलींचा मेळा दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास बाळापूर तालुक्यातील कसुरा येथे दाखल झाला.

अकोला जिल्ह्याचा उंबरठा ओलांडताच संतांच्या अभंगातील भाव वारकऱ्यांच्या मनी दाटून आला. संत श्री गजानन महाराज यांचा श्री क्षेत्र पंढरपूरवारीचा ५५ वा पालखी सोहळा यावर्षी नव चैतन्याने फुलून गेला.

आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी यावर्षी ७५० हून अधिक वारकऱ्यांसह, रथ, मेणा, टाळकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दरम्यान कसुरा ते पारस रस्त्यावर श्रींच्या पालखीचे हर्षोउल्हासात स्वागत करण्यात आले. तसेच ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या.

माऊली भक्तांना पिण्याचे पाणी आणि महाप्रसादाची सोय केली. अकोला जिल्हा सीमेवरील स्वागत स्वीकारून वारकऱ्यांची ही मांदियाळी पारस येथे मुक्कामी विसावली. शुक्रवारी (ता.१४) रोजी श्री माऊलींचा पालखी सोहळा निमकर्दा मार्गे गायगांवकडे मार्गस्थ होऊन पालखी रात्री भौरद येथे मुक्कामी असणार आहे.

श्रींच्या पालखीचा मार्ग मोकळा करण्यासाठी उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले व पोलिस कर्मचारी, वाहतूक पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी यांच्यासह आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

असा असेल श्रींच्या पायदळ वारीचा मार्ग

श्री गजानन महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम ता. १३ जून रोजी पारस येथे होणार आहे. ता. १४ जून भौरद, ता. १५ व १६ जून अकोला, ता. १७ जून वाडेगाव, ता. १८ जून पातूर, ता. १९ जून श्री क्षेत्र डव्हा, ता.२० जून श्री क्षेत्र शिरपूर, ता. २१ जून महसला पेन, ता. २२ जून रिसोड, ता. २३ जून सेनगाव, ता. २४ जून दिग्रस,

ता. २५ जून जवळा बाजार, ता. २६ जून श्री क्षेत्र त्रिधारा, ता. २७ जून परभणी, ता. २८ जून दैठणा, ता. २९ जून गंगाखेड, ता. ३० जून परळी थर्मल, १ जुलै परळी वैजनाथ, ता. २ जुलै अंबाजोगाई, ता. ३ जुलै बोरी सावरगाव, ता. ४ जुलै कळंब, ता. ५ जुलै तेरणा सहकारी साखर कारखाना, ता. ६ जुलै उपळा, ता. ७ जुलै धाराशिव, ता. ८ जुलै श्रीक्षेत्र तुळजापूर,

ता. ९ जुलै उळे, ता. १० व ११ जुलै सोलापूर, ता. १२ जुलै तिरहे, ता. १३ जुलै मानपूर, ता. १४ जुलै श्री क्षेत्र मंगळवेढा तर, ता. १५ जुलै रोजी पंढरपूर येथे पालखीचे आगमन होईल. ता.१५ जुलै ते २० जुलैपर्यंत पालखीचा पंढरपूर मुक्काम राहणार आहे. ता. २१ जुलै रोजी पंढरपूर येथून पालखीचे प्रस्थान.

३३ दिवसांचा प्रवास

शेगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूरपर्यंतचा तब्बल ३३ दिवसांचा पायदळ ७५० किमीचा प्रवास करीत पालखी ता. १५ जुलै रोजी पंढरपुरात पोहोचेल. श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे ५५ वे वर्ष आहे.

२१ जुलै रोजी पंढरपूर येथून पालखीचे प्रस्थान

२१ जुलै रोजी पंढरपूर येथून पालखीचे प्रस्थान होणार असून परतीचा मुक्काम करकंब, कुरूडवाडी, उपळाई स्टेशन, भगवान बार्शी, भूम, चौसाळा, पाली, बीड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, बीबी, लोणार, मेहकर, जानेफळ, शिरला नेमाने, आवार, खामगाव मार्ग शेगाव येथे पालखी पोहोचणार आहे. श्री गजानन महाराज संस्थानकडून पालखीची जय्यत तयारी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT