अकोला : जिल्ह्यामध्ये गत काही दिवसांपासून कोरोना बाधितांची(akola corona update) संख्या झपाट्याने वाढत आहे. सदर रुग्णसंख्या नियंत्रणात रहावी यासाठी जिल्हाधिकारी निमा(collector nima arora) अरोरा यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार रविवारच्या (ता. ९) रात्री पासून जिल्ह्यात रात्राची संचारबंदी(night Curfew) व दिवसा जमावबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहेत.
कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन प्रकार जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. राज्यात ओमायक्रॉन कोविड १९ बाधित रुग्ण आढळून येत आहेत. या विषाचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही आपत्कालीन उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दि ॲपडमिक डीसीज ॲक्ट १८९७ च्या कलम २ अंतर्गत व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गतच्या इतर सर्व सक्षम तरतुदींसह महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यात काही निर्बंध लागू केले आहेत. ९ जानेवारीचे रात्री १२ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात निर्बंध लागू राहणार आहेत.
असे आहेत निर्बंध
व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध : सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहील.
खासगी कार्यालये : व्यवस्थापनाने कर्मचारी यांच्या कामांचे तास निश्चित करुन शक्यतोवर वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून कामे करावी. नियमित उपस्थितीच्या ५० टक्के पेक्षा जास्त कर्मचारी संख्या उपस्थित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. लसीकरणाच्या दोन्ही मात्र घेतलेल्लाय कर्मचाऱ्यांनाच कार्यालयामध्ये प्रवेश राहील. व्यवस्थापनाने कामाचे तास ठरवितांना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सुविधा विचारात घ्यावी.
समारंभ : जास्तीत जास्त ५० व्यक्ती. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमात जास्तीत जास्त ५० व्यक्ती उपस्थित राहतील.
अंत्यविधी : अंत्यविधीला जास्तीत-जास्त २० व्यक्तींना उपस्थित राहता येईल.
हेअर कटींग सलून : ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. कटींग सलून मधील इतर उपक्रम बंद राहतील. काम करणाऱ्या व्यक्तीने लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक राहील.
क्रीडा स्पर्धात्मक कार्यक्रम : केवळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या स्पर्धा विना प्रेक्षक घेता येतील. जिल्हास्तरीय कोणत्याही स्पर्धा आयोजित करता येणार नाहीत.
शॉपिंग मॉल्स, दुकाने व रेस्टॉरेंट, कॅटरिंग, सिनेमा थियेटर : फक्स लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी राहील. ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येईल. सर्व दिवशी होम डिलीव्हरीला परवानगी असेल.
शाळांना खालील बाबतीत मुभा
इयत्ता अकरावी व बारावी करिता विविध शैक्षणिक मंडळांनी निश्चित केलेले उपक्रम, प्रशासकीय उपक्रम आणि वर्गातील शिकवण्या व्यतिरिक्त शिक्षकांनी हाती घेतलेले उपक्रम, शालेय शिक्षण विभागा द्वारे निर्देशित किंवा परवानगी असलेले उपक्रम, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग महिला आणि बाल विकास विभाग आणि कोणतीही वैज्ञानिक प्राधिकरण इतर अत्यावश्यक उपक्रम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडून मान्यता घेऊन सुरू ठेवण्यास परवानगी सुद्धा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेशान्वये दिली आहे.
मास्कचा वापर अनिवार्य
जिल्हाधिकारी यांनी सर्व सार्वजनिक ठिकाणी वावरतांना तसेच शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यावर तसेच संबंधित आस्थापनेवर दंडनीय कार्यवाई संबंधित प्राधिकारी यांचेकडून करण्यात येईल.
दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल किंवा ई-कॉमर्समध्ये गुंतलेल्या कोणत्याही आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना पूर्ण लसीकरण करणे आवश्यक राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.