अकोला : आरटीई प्रवेश, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रे काढावी लागत आहेत. मात्र, आपले सरकार पोर्टल व महाऑनलाइनचे सर्व्हर गत २० दिवसांपासून सातत्याने डाउन आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.
उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला यांसह इतर प्रमाणपत्र प्रलंबित असल्याने प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत आहेत. सर्व्हरच्या तक्रारीबाबत प्रशासनाच्या वतीने आयटी विभागाकडे पाठपुरावाही सुरू असल्याची माहिती आहे.
सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक महिलांनी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तर शाळा महाविद्यालय सुरू झाले असल्याने विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत.
तसेच रहिवासी प्रमाणपत्र, इन्कम प्रमाणपत्र, वरिष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अल्प भूधारक प्रमाणपत्र, तात्पुरते रहिवासी प्रमाणापत्र, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र यासह इतर प्रमाणपत्रांसाठी अर्ज दाखल झाले आहेत. मागील काही दिवसांपासून महाऑनलाइनचे सर्व्हर डाऊन झाल्याने अनेकांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी येत आहे. शासनस्तरावर हे पोर्टल व सर्व्हर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. अर्जदाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यास तो अर्ज सबमिट होण्यास बराच विलंब लागतो.
सर्वसामान्य नागरिक लॉगिन करू शकतात; परंतु त्यांना अर्ज भरताना वारंवार अडचणी येत आहे. बहुतांश वेळा दिवसा सर्व्हरची गती कमी असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी अर्जाचा भरणा केला जातो. मात्र दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळीसुद्धा हीच अडचण येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे सीएससी चालकांकडे मोठी गर्दी होत आहे. एका केंद्र चालकाचा लॉगिन आयडी आठ ते दहा ठिकाणी एकाच वेळी चालविला जात आहे. त्यामुळे सर्व्हर डाउनची समस्या निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून दाखल करण्यात आलेली शेकडो प्रमाणपत्र प्रलंबित आहेत. या प्रमाणपत्रांमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सर्व्हरची समस्या निकाली काढण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.