shaikh affan shaikh ayyub sakal
अकोला

Akola Crime : चुलत भावानेच आवळला सात वर्षीय मुलाचा गळा

सात वर्षीय मुलाच्या हत्‍येचे गुढ उकलले; शेतातील विहिरीत १६ दिवसांनी मिळाला होता मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

अकोला - कबुतर पकडण्यासाठी शेतात गेला असता तेथे झालेल्या वादानंतर सात वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह शेतातील विहिरीत टाकून दिला. १६ दिवसांनी मृतदेह विहिरीत आढळून आला. मुलाचा खून गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मारेकऱ्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर हा खून मृतकाच्या विधिसंघर्ष १७ वर्षीय चुलत भावानेच केला असल्याचे गुढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले.

अकोला जिल्ह्यात नव्याजे रुजू झालेले पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने पहिलीच उत्कृष्ट कारवाई करीत सात वर्षाच्या मुलाचा हत्येच्या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली. ता. १९ डिसेंबर २०२३ पासून हरवलेला मुलगा शेख अफ्फान शेख अय्युब (रा. बागवानपुरा पिंजर) याचा मृतदेह स्थानिक गुन्हे शाखा अकोला, श्वान पथक व पिंजर येथील पोलिस तसेच संत गाडगेबाबा आपातकालीन पथक पिंजर यांचे १२ दिवसांचे अथक प्रयत्नाने पिंजर-अकोला रोडवरील विहिरीत सापडला होता.

घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी मूर्तिजापूर मनोहर दाभाडे, स्थानिक गुन्हे शाखा अकोला प्रमुख पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पो.उप. नि. गोपाल जाधव व पोलिस स्टेशन पिंजरचे ठाणेदार स. पो. नि. राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस अधीक्षकांनी तपासाबाबत सूचना दिली.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विचारपूस करीत, तांत्रिक माहिती व पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनावरून गुन्ह्यातील संशयित यांना ताब्यात घेतले. सखोल विचारपूस केली असता मयत शेख अफ्फान शेख अय्युब याचा खून त्याचा चुलत भाऊ विधी संघर्षित बालक वय १७ वर्षे याने केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पो. नि. शंकर शेळके, सपोनि कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव, व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस अंमलदार दशरथ बोरकर, राजपालसिंह ठाकुर, गोकुळ चव्हाण, प्रमोद डोईफोडे, फिरोज खान, रवी खंडारे, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, महेंद्रं मलीये, अविनाश पाचपोर, खुशाल नेमाडे, लिलाधर खंडार, शेख अन्सार एजाज अहेमद, आकाश मानकर, धीरज वानखडे, उदय शुक्ला, स्वप्निल चौधरी, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, चालक शेख नफीस, अक्षय बोबडे, प्रवीण कश्यप, अनिल राठोड व तांत्रिक विश्लेषक राहुल गायकवाड, गोपाल ठोंबरे, आशिष आमले यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT