Seventy thousand Children will get corona vaccines shield sakal
अकोला

अकोला : ७० हजार मुलांना मिळणार लशीचे कवच!

१५ ते १८ वयोगटातील मुलांना ३ जानेवारीपासून लस

सकाळ वृत्तसेवा

अकोला : देशभरातील कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटच्या वाढत्या संसर्गाला पायबंद घाण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेची व्याप्ती आणखी वाढविली आहे. त्यानुसार ३ जानेवारी २०२२ पासून लहान मुलांचे लसीकरण (corona vaccines) केले जाणार असून खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि सहव्याधी असणाऱ्या आणि साठीपार केलेल्या ज्येष्ठांनाही प्रतिबंधात्मक डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांची संख्या ७० हजारांवर असल्याने त्यांना नवीन वर्षात लस देण्यात येईल.

कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला विशेष महत्व आहे. पहिल्या लाटेनंतर लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत आरोग्य विभागामार्फत नागरिकांच्या लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी यासाठी नागरिकांना लस सुद्धा मोफत देण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लस घेणाऱ्यांवर विषाणूचा हल्ला झाल्यानंतर सुद्धा लसवंताला फारसा प्रभाव न झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान ओमिक्रॉन व्हेरियंटचा वाढता धोका व कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता घेता सदर लाट थोपवण्यासाठी लसीकरण हाच एकमात्र उपाय असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढवण्यासाठी व अधिकाधिक नागरिकांना लस मिळावी यासाठी मिशन कवच कुंडल अभियानानंतर आता केंद्र सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढवली आहे. त्यानुसार नव वर्षात जिल्ह्यातील ७० हजार मुलांना लस देण्यात येणार आहे.

लहान मुलांना ‘कोव्हॅक्सिन’ची मात्रा

भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांनी मिळून विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या लहान मुलांवर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मुलांना कोव्हॅक्सिन लसच देण्यात येणार आहे. नव्या मोहिमेनुसार लस घेणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने भविष्यात मुबलक पुरवठा न झाल्यास जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचा तुटवडा जाणवू शकतो. दरम्यान सध्या जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे कोव्हॅक्सिनचे ५० हजार डोस शिल्लक असून त्यापैकी ३० हजार डोसचा उपयोग दुसऱ्या डोससाठी याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

‘प्रतिबंधात्मक डोस’ही मिळणार

पंतप्रधान मोदी यांनी १० जानेवारी पासून फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठांना प्रतिबंधात्मक डोस देण्याचेही जाहीर केले आहे. त्यानुसार साठीपार केलेल्या ज्येष्ठांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक डोस घेता येईल. त्यामुळे पुढील महिन्यात पुन्हा एकदा लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळण्याची शक्यता अधिक आहे.

"जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांची संख्या ७० हजाराच्या जवळपास आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सूचनांप्रमाणे या वयोगटातील लाभार्थ्यांना लस देण्‍याची पुढील कार्यवाही करण्यात येईल. दुसरा डोस घेणाऱ्यांनी सुद्धा निर्धारित वेळेतच लसीकरण करुन घ्यावे."

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला

लाभार्थी - पहिला डोस - दुसरा डोस

  • हेल्थ केअर वर्कर - १३७४६ - १२५०८

  • फ्रंट लाईन वर्कर - १४२७२ - १३६१९

  • १८ ते ४४ वयोगट - ६०६०५० - २६४४७०

  • ४५ ते ५९ वयोगट - २६३४०९ - १५९३६२

  • ६० वर्षावरील - २०१२३७ - १२४२४९

  • एकूण - १०९८७१४ - ५७४२०८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT