shegaon Balapur mild earthquake was felt in 2 9 recorded on Richter scale Sakal
अकोला

Earthquake : शेगाव, बाळापूरमध्ये जाणवला भूकंपाचा सौम्य धक्का; २.९ रिश्टर स्केलवर झाली नोंद

संत नगरी म्हणून राज्यात व बाहेर प्रसिद्ध असलेल्या शेगाव शहरातील अनेक भागात २६ मार्च रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजे दरम्यान भूकंपाचा अतिशय सौम्य असा धक्का नागरिकांना जाणवला. यामुळे काही वेळ अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण ही निर्माण झाले .

सकाळ वृत्तसेवा

शेगाव (बुलढाणा) : संत नगरी म्हणून राज्यात व बाहेर प्रसिद्ध असलेल्या शेगाव शहरातील अनेक भागात २६ मार्च रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजे दरम्यान भूकंपाचा अतिशय सौम्य असा धक्का नागरिकांना जाणवला.यामुळे काही वेळ अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण ही निर्माण झाले . तर काहींना धक्का जाणवला ते समजलेच नाही.

शेगावात 2.9 रिश्टर स्केलवर झाली नोंद झाली असून यास तहसीलदार डी आर बाजड यांनीही दुजोरा दिला आहे. शेगावात या सौम्य धक्क्यांची २.९ रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आवाहन तहसीलदार यांनी लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून केले.

शेगाव शहरा सोबतच नजीक असलेल्या बाळापूर मध्ये ही सौम्य धक्का जाणवल्याची माहिती समोर येत आहे. वाढते तापमान आणि भूगर्भातील होणारे बदल पाहता असे धक्के बसत असावे असा तर्क काही जाणकारांनी काढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

Goodbyes are never easy! ऋषभ पंतची पोस्ट व्हायरल; लिलावात २७ कोटी मिळाल्यानंतर नेमकं असं का म्हणतोय?

Accident News: अतिशय गंभीर...52 विद्यार्थी प्रवास करत असलेली ट्रॅव्हल्स पलटी, विद्यार्थिनी जखमी!

'महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात आणि गुजरातची EVM महाराष्ट्रात येतात, त्यामुळं काहीतरी घोळ..'; रोहित पवारांना शंका

EVM Vote Counting: ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये तफावत का आढळली? मोठी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT