shivni airport issue solve mla savarkar and shambhuraj desai vc discussion Sakal
अकोला

Akola News : विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा मार्गी लावा; सावरकर यांची मंत्री देसाई यांच्यासोबत व्‍हीसीद्वारे चर्चा

खासगी जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी सुमारे १९६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सकाळ वृत्तसेवा

Akola News : शिवणी विमानतळाचा विस्तार करुन विमानतळावरून हवाई वाहतूक सुरू करण्याची कार्यवाही तातळीने सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी अकोला पूर्वचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी मंगळवारी (ता. २) मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत व्हिसीद्वारे चर्चा केली. या आभासी बैठकीत जिल्हाधिकारी कुंभार यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

गेल्या कित्तेक वर्षांपासून शिवणी विमानतळाचे विस्तारीकरण खासगी जमिनीच्या अधिग्रहणामुळे रखडले आहे. शिवणी विमानतळाची सध्याची धावपट्टी १४०० बाय ४५ मीटर लांबी, रूंदीची असल्यामुळे धावपट्टीवर एटीआर-४२ प्रकारची विमाने उतरवणे शक्य आहे.

परंतु एटीआर-७२ प्रकारची विमाने उतरण्यासाठी खासगी जमीन अधिग्रहण केल्याशिवाय विमानतळाचा विकास शक्य नाही. त्यामुळे विमानतळ विकासाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी खासगी जमीन अधिग्रहण करण्याचे आदेश दिले हाेते.

असे असल्यानंतर सुद्धा निधी अभावी अद्याप खासगी जमिनीचे अधिग्रहण रखडले आहे. विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १४०० मीटर वरून १८०० मीटर करण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून जमीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

परंतु अद्याप शासनाकडून पुढील निर्देश न मिळाल्याने व खासगी जमिन अधिग्रहित करण्यासाठी निधी उपलब्ध न झाल्याने विमानतळाचा विस्तार थंडबस्त्यात आहे. दरम्यान या रखडलेल्या विषयाचा चालना मिळावी यासाठी आमदार सावरकर यांनी व्हिसीद्वारे मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री शंंभूराज देसाई यांनी दिल्या.

याबाबत झाली चर्चा

खासगी जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी सुमारे १९६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जमिन संपादनाची कार्यवाही राज्य शासनाकडून करावयाची आहे. त्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत सरळ वाटाघाटी करून मधल्या मार्गाने जमिनीचा खर्च निर्धारित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

याकरिता जिल्हाधिकारी यांच्या समन्वयातून जमिन संपादनाचा खर्च निश्चित करण्यात यावा, याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत धावपट्टी दोन हजार ५०० मीटर करण्यात यावी यावर सुद्धा चर्चा करण्यात आली. या दोन्ही प्रस्तावांची व्यवहार्यता तपासून अहवाल जिल्हाधिकारी यांनी सादर करावा अशा सूचना देण्यात आल्या.

प्रथम टप्प्यात १८०० मीटर लांबीची धावपट्टी करून हवाई वाहतूक लवकर कशी सुरू करता येईल या दृष्टीने शासनाने विचार करावा अशी मागणी आमदार सावरकर यांनी बैठकीत केली. दुसऱ्या टप्प्यात धावपट्टीची लांबी वाढविण्यात यावी असे त्यांनी सांगितले.

डॉ. पंदेकृविची ६०.६८ हेक्टर जमीन हस्तांतरित

शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी डॉ. पंजाबराव देखमुख कृषी विद्यापीठाची माैजे गुडधी येथील २०.७९ हेक्टर, माैजे शिवर येथील ३९.८९ हेक्टर अशी एकूण ६०.६८ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. सदर जमिनीचा ताबा विमानपत्तन प्राधिकरणाला देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Shivsena Candidate List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर! १५ जणांच्या नावांचा समावेश, दोन जागा मित्रपक्षांना; शायना एनसी यांना उमेदवारी

Pradip Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं बंड! शिवसेनेचा आदेश डावलून पत्नीचा अपक्ष अर्ज भरणार

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

SCROLL FOR NEXT