shivshahi bus of msrtc caught fire on Khamgaon Akola highway Sakal
अकोला

ST Fire Accident : खामगाव अकोला मार्गावर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला आग

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : एसटी महामंडळाच्या धावत्या शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना खामगाव अकोला मार्गावर रिधोरा जवळ गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेत शिवशाही बस संपूर्ण जळून खाक झाली.

शेगाव येथून अकोलाकडे जाणाऱ्या शिवशाही या स्लीपर कोच बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती बस चालकाने दिली आहे. गुरुवारी साडे बारा वाजताच्या सुमारास ही बस अकोलाकडे जात असताना रिधोरा परीसरातील अशोक लेलँड वर्कशॉप जवळ बसच्या इंजीनमधून धूर निघत असल्याची बाब चालकाच्या लक्षात आली.

चालकाने बस थांबवत बस मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर आग विझविण्यासाठी बस मधील सिलेंडरचा वापर केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. मात्र बंब येईपर्यंत बस खाक झाली हाेती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीत एसटी महामंडळाचे खुप मोठे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT