लसींचा तुटवडा; दुसरा डोस २० टक्केच; ४३ टक्केच लसीकरण
आतापर्यंत सहा लाख पाच हजार ३७६ लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ७८ हजार ६३३ ज्येष्ठ, तर ४५ वर्षावरील वयोगटातील ८५ हजार १५७ लाभार्थींनी लसीचा पहिला डोस देण्यात आला.
अकोला : जिल्ह्यात कोविड-१९ (Covid 19 In Akola) आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वारंवार जाणवणाऱ्या तुटवड्यामुळे खोळंबा होतो आहे. त्यामुळे जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात आतापर्यंत पहिला डोज ४३ टक्के तर दुसरा डोज २० टक्के नागरिकांनाच मिळू शकला. Shortage of corona vaccine in Akola district
कोरोना लसीकरणाबाबत जनजागृतीनंतर जिल्ह्यात लस डोचून घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर रांगा बघावयास मिळत आहे. मात्र, शासन व प्रशासनाला त्यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात अपयश आले आहे. परिणामी जिल्ह्यात वारंवार लसीकरणाची मोहीम खंडीत होताना दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सहा लाख पाच हजार ३७६ लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ७८ हजार ६३३ ज्येष्ठ, तर ४५ वर्षावरील वयोगटातील ८५ हजार १५७ लाभार्थींनी लसीचा पहिला डोस देण्यात आला.
दुसऱ्या डोजचे घोडे अडले
जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, पहिली लस घेतल्यानंतर दुसऱ्या डोजसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यातही आरोग्य विभागाकडून दोन डोजमधील अंतराबाबत दररोज नवीन माहिती पुरवली जात असल्याने पहिला डोज घेणारे संभ्रमात पडले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २६ हजार १३५ ज्येष्ठ, तर ४५ वर्षावरील २० हजार ५२६ लाभार्थींनांच लसीचा दुसरा डोज देण्यात आला आहे.
५२ हजारांवर ज्येष्ठ नागरिक दुसऱ्या डोजच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यात अद्यापही सुमारे एक लाख १७ हजार १२९ लोकांना दुसऱ्या डोजची प्रतीक्षा आहे. यामध्ये ५२,४९८ ज्येष्ठ नागरिक, तर ४५ वर्षावरील ६४ हजार ६३१ नागरिकांचा समावेश आहे.
संपादन - विवेक मेतकर
Shortage of corona vaccine in Akola district
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.