Bus and Truck Fire Sakal
अकोला

एसटी बस व ट्रकची धडक; दोन्ही वाहने आगीत भस्मसात

अपघातात ट्रक व बसला आग लागल्याने दोन्ही वाहने जळून खाक झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर आज घडली.

अनिल दंदी

बाळापूर - राज्य परीवहन महामंडळाच्या बुलडाणा - अकोला या बस वर समोरुन भरधाव येणारा ट्रक आदळून झालेल्या अपघातात बस मधील अकरा प्रवाशी जखमी झाले असून या अपघातात ट्रक व बसला आग लागल्याने दोन्ही वाहने जळून खाक झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर आज बुधवारी दुपारच्या सुमारास शेळद फाट्या जवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

बुलडाणा आगाराची क्र. एम एच ४० ए क्यू ६१६० हि एसटी बस बुलढाणा येथून प्रवासी घेऊन अकोला येथे निघाली असताना राष्ट्रीय महामार्गावरील शेळद फाट्या नजीक पोचताच समोरुन भरधाव येणारा ट्रक बस वर आदळला. त्यामुळे अपघात होऊन बस मधील बाविस प्रवाशांपैकी अकरा प्रवासी जखमी झाले. अपघात होताच बसने अचानक पेट घेतला. अपघात होताच बसच्या इंजीनमध्ये शाॅर्टसर्कीट झाल्याने स्फोट होऊन ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. बस भडकताच ट्रकनेही पेट घेतला.

अचानक लागलेल्या आगीमुळे बस मधील प्रवासी हादरून गेले होते. मात्र सुदैवाने यामध्ये जिवीतहानी झाली नाही. महामार्गाने जाणाऱ्या नागरीकांनी बस मधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. बघता - बघता ट्रक व बसला आगीने कवेत घेतले. व काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली.

पोलिस व नागरीकांच्या सतर्कतेचे वाचले प्राण

नुकताच जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाल्याने बाळापूर पोलिसांचे पथक देगाव येथे बंदोबस्तासाठी निघाले असताना आगीचा प्रकार पोलिसांच्या दृष्टीस पडला. पोलिसांनी गाडी थांबवली. आणि बसच्या खिडकीच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. सहा. पोलिस निरीक्षक विनोद घुईकर, अक्षय देशमुख, चालक सुनील अंभोरे यांनी जीवाची पर्वा न करता बसच्या खिडकीच्या काचा फोडून आत शिरले. यावेळी रिधोरा येथील धर्मेन्द्र दंदी, विशाल दंदी, बाळापूर पंचायत समितीचे सभापती मंगेश गवई यांनीही या कामी पोलिसांना मदत केली. बसमधील चालक आणि सर्व प्रवासी सुखरूप उतरल्यानंतर बस भस्मसात झाल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तासाभरा नंतर अग्निशमन बंब दाखल

घटनेची माहीती प्रथम अकोला व त्या नंतर बाळापूर अग्नीशमन विभागाला देण्यात आली. मात्र घटना घडून पाऊण तास उलटूनही अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले नव्हते. त्यामुळे दोन्ही वाहने आगीत भस्मसात झाले. त्यानंतर अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली.

प्रवाशांच्या सुरक्षितते बाबत प्रश्न चिन्ह

महामंडळाच्या एस टी बसला अशा प्रकारे आग लागणे धोकादायक असल्याने प्रवासी सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.यावर एस टी महामंडळा कडून कोणतीच उपाय योजना केली जात नाही.अनेकदा एस टी बसचे किस्से ऐकायला मिळतात व प्रवाशांनी अनुभवही घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT