बुलडाणा : राज्यात सलग दुसर्या वर्षीही कोरोना संसर्ग (Corona Virus) वाढल्यामुळे याचा फटका व्यावसायिकांसोबत हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असलेल्या राज्य परिवहन महामंडळावरही (Maharashtra State Transport Corporation) पडला. पहिल्या वर्षी वेतनासाठी महामंडळाच्या कर्मचार्यांना तर आंदोलन आणि एल्गार करावा लागला होता. त्यानंतर टप्याटप्याने वेतन मिळाले. यंदाही हीच परिस्थिती ओढवली आहे. परंतु, आता संख्या कमी होत असतानाही एसटी बसेसला अद्यापही ब्रेक लागलेला आहे. याउलट खासगी ट्रॅव्हल्सला लांब पल्ला राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर अशी मुभा देण्यात आली असताना एसटी महामंडळाला का नाही असा सवाल आता प्रवाशांकडून विचारला जात आहे. (Starting a private travels business, then why not ST)
राज्यातील वेगवेगळ्या आगारासह जिल्ह्यातील आगारातील एसटी गेल्या तीन महिन्यांपासून रुसली आहे. प्रवाशांची वाहतूक बंद असल्यामुळे महामंडळातील कर्मचार्यांचा वेतन प्रश्न ऐरणीवर आला आहे. उत्पन्न हे शून्यच असल्यामुळे वेतन करणार कसे अशी मोठी अडचणी अधिकार्यांसमोर आले.
दरम्यान, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरवातीला पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णसंख्येपैकी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आता कमी सर्वत्र कमी होऊ लागली आहे. यातच अकोला, अमरावती येथून पुणे, मुंबई शहराकडे खासगी लक्झरी ट्रॅव्हल्स सुसाट धावत आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचे नियम पाळल्या जात नसून, प्रवाशांची मर्यादीत संख्या अशी अट असतानाही तिला फाटा देत निर्बंधाला तोडून वाहतूक करण्यात येत आहे.
जर, खासगी ट्रॅव्हल्सला प्रवासी वाहतुकीची परवानगी मिळू शकते तर एसटी महामंडळाला का नाही असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. एसटी महामंडळानेही थेट किंवा ब्रेक जर्नी सुरू केली तर उत्पन्न मिळण्यास सुरवात होऊन वेतनासह इतर बाबींचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
उत्पन्न हे केवळ 30 हजार, पगार 25 कोटींच्या घरात
सध्या जिल्ह्यातील 7 आगारात 2 हजार 800 च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्या पगारासाठी जवळपास 25 कोटीची महिन्याला गरज असते. अशा परिस्थितीत सातही आगारातील उत्पन्न हे केवळ 30 हजार येत असून, ते सुध्दा मालवाहतूकीच्या माध्यमातून येत आहे. प्रवासी वाहतुकीच्या उत्पन्नाचा आकडा हा शून्य असून, एसटी महामंडळालाही खासगीच्या तुलनेत अटी व शर्थी लागू करत प्रवासी वाहतुकीला परवानगी देणे गरजेचे झाले आहे. ज्यामुळे सध्यास्थितीत कोरोनाच्या नावावर होणारी प्रवाशांची आर्थिक लूट थांबेल आणि महामंडळाच्या उत्पन्नाचा मार्ग मोकळा होईल.
टप्याचा प्रवासही सुरू
जिल्ह्यातील निर्बंध हळूहळू शिथिल होत असून, प्रवास करताना नागरिकांची झुंबड दिसत आहे. नांदुरा ते खामगाव, खामगाव ते चिखली तसेच, नांदुरा ते मोताळा यासह जिल्ह्यात इतर मार्गावर काही प्रमाणात काळीपिवळी वाहतूक सुरू झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे सदर वाहतूक ही पोलिस कर्मचार्यांच्या समोर शारीरिक अंतर किंवा विना मास्क सर्रास होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वरिष्ठांना निर्णय घेण्याचे अधिकार
जिल्ह्याअंतर्गत किंवा जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीसाठी एसटी बस सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे प्रशासनाने सध्या वरिष्ठांकडे दिले आहे. त्यामुळे याबाबत सर्व निर्णय मध्यवर्ती कार्यालयातून घेतल्या जात आहे. कर्मचार्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे.
संपादन - विवेक मेतकर
(Starting a private travels business, then why not ST)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.