अकाेला : बदलत्या हवामानाचा अभ्यास करून शेतीचे नियोजन करा sakal
अकोला

अकाेला : बदलत्या हवामानाचा अभ्यास करून शेतीचे नियोजन करा

देवरी येथे हवामान विशेषज्ञ पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला

सकाळ वृत्तसेवा

अकोट : भारत हा शेती प्रधान देश आहे. शेतीवर अंवलंबून असणाऱ्यापुढे बेभरोशाचा पाऊस हीच खरी समस्या झाली आहे. पृथ्वीचे वाढते तापमानामुळे हवामानात मोठे बदल घडत आहेत. या बदलांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करावे. असे, कळकळीचे आवाहन हवामान विशेषज्ञ शेतकरी मित्र पंजाबराव डख यांनी केले.

अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम देवरी येथे पार पडलेल्या हवामान विषयक शेतकरी संवाद मेळाव्यात पंजाबराव डख बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंचा वर्षा गायकवाड होत्या. यावेळी आ.रणधीर सावरकर, ज्येष्ठ सहकार नेते नानासाहेब हिंगणकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॕड. गजानन पुंडकर, केशवराव मेतकर, सुरेश खोटरे, पंजाबराव सिरसाट, डाॕ.राजेश नागमते, कपिल ढोके, मधुकर पाटकर, अनिल कोरपे, पं.स. सदस्या हरिदिनी वाघोडे, भानुदास भारसाकडे, सुभाषराव गायकवाड, शेषराव लताड, डाॕ.योगेश गायकवाड उपस्थित होते.

पंजाबराव डख पुढे म्हणाले की, भविष्यात पाऊस कमी पडणार नाही. कोरडा दुष्काळही पडणार नाही तर, पाऊस अति प्रमाणात पडेल. कुठं हेच प्रमाण अल्प असेल. त्यामुळेच शेतीचं मोठं नुकसान होते. पर्यावरणाचं संतुलन बिघडलं आहे, वृक्षतोड झाल्याने तापमान वाढत असल्याचा हा दुष्परिणाम आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात झाडं लावा आणि ते जगवा. बदलत्या हवामानानुसार शेती करण्याची वेळ आली आहे.

पिकाचे वाण त्यानुसार निवडा. तरच शेतकरी टिकेल आणि जगेल. असे, सांगून त्यांनी पावसाच्या अंदाजाचे अनेक ठोकताळे सांगीतले. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाऊसाच्या अंदाज सांगत सजग करण्यासाठी लाखो शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. संचालन सचिन माहोकार यांनी केले तर, आभार देवेंद्र फोकमारे यांनी मानले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विनोद वाघोडे, पंकज फोकमारे, विनय फोकमारे, विनोद नांदुकर, संजय गायकवाड, संतोष फोकमारे, मिलिंद गायकवाड, डाॕ. अजय गायकवाड, बंडू फोकमारे, राहुल पोटे, संतोष गायकवाड, महादेवराव कवळकार, निखिल वाघोडे, निलेश फोकमारे, डाॕ.रवी फोकमारे, निखिल पातुर्डे, स्वप्निल गायकवाड, राजू गायकवाड, संतोष फोकमारे, शरद फोकमारे, गजानन काटोले यांनी परिश्रम घेतले.

बैलगाडीतून काढली मिरवणूक

यावेळी संयोजन समितीव्दारा गावकऱ्यांच्या वतीने हवामान विषयक सुक्ष्म अभ्यास करून पावसाचा अचूक अंदाज सांगणारे पंजाबराव डख यांचे सेवा कार्याच्या गौरवार्थ नागरी सत्कार करण्यात आला. त्यापूर्वी सजविलेल्या बैलगाडीत त्यांना वाजत-गाजत कार्यक्रमस्थळी पंचमुखी महादेव मंदिरात आणण्यात आले. यावेळी फटाक्याची आतषबाजी करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आदर्श पटवारी राहुल बंकेवार यांचे उत्कृष्ट सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. गोविंद नागे यांनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT