अकोला

होमिओपॅथिक गोळ्यांमधील औषधी घटक तपासले जाणार

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून ग्रामीण भागातील नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी गावा-गावात जिल्हा परिषदेमार्फत आर्सेनिक अल्बम या होम्योपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. परंतु त्यानंतर सुद्धा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा अधिक झाला? गोळ्यांमध्ये आवश्यक औषधी घटक नसल्यानेच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, असा आरोप शिवसेनेचे सदस्य प्रशांत अढावू यांनी ऑनलाईन स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला. त्यामुळे वाटप करण्यात आलेल्या गोळ्यांमध्ये औषधी घटक आहेत अथवा नाही याची अन्न व औषधी प्रशासनामार्फत तपासणी करण्याचे आदेश जि.प.च्या अध्यक्षा प्रतीभा भोजने यांनी दिले. (The medicinal components of homeopathic pills will be examined by Akola Zilla Parishad)

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी (ता. ३) ऑनलाईन पद्धतीने पार पडली. सभापतीपदी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतीभा भोजने उपस्थित होत्या. सभेत जिल्हा परिषदेचे सदस्य प्रशांत अढावू यांनी वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी लाभ खरेदी करण्याची मुदत लॉकडाउनमुळे वाढवण्यात आली होती, असे सांगितले. परंतु निर्बंध आता शिथिल झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी अद्याप लाभ घेतलाच नसल्यामुळे सदर मुदत एक महिन्याने वाढवण्याची मागणी जि.प. सदस्य प्रशांत अढावू यांनी लावून धरली. त्यावर सदर विषयाला सर्वसाधारण सभेत मंजुरी घेवू, असे वंचितचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सांगितले. सभेत उपाध्यक्षांसह इतर सदस्य व प्रशासनातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.



इतर मुद्यांवरही वादळी चर्चा
- सभेत बाळापूर तालुक्यातील वाडेगावचे ग्रामसेवक यांच्याकडून अतिरिक्त प्रभार काढण्याची मागणी जि.प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी लावून धरली. या प्रकरणाची चौकशी करुन चार दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी दिले.
- बार्शीटाकळी तालुक्यातील गोरव्हा गावामध्ये बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आला, असे शिवसेनेचे सदस्य गोपाल दातकर यांनी सांगितले. त्यावर महिला व बाल कल्याण अधिकारी विलास मरसाळे यांनी सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
- लवकरच खरीप हंगाम सुरू होणार असल्याने प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये विक्रीसाठी उपलब्ध बियाणे व खतांच्या किंमतीचे बोर्ड व उपलब्ध असलेला साठा दर्शनी भागात लावण्याचे निर्देश सभेत कृषी विभागाला सभेत देण्यात आले.

संपादन - विवेक मेतकर
The medicinal components of homeopathic pills will be examined by Akola Zilla Parishad

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT