Akola Navratri 2024  sakal
अकोला

Akola Navratri 2024 : आदीशक्तीचे चौदावे जागृत शक्तिपीठ ‘माता रुद्रायणी’, नवरात्रीत भाविकांची गर्दी

Akola Navratri 2024 : चिंचोली रुद्रायणी येथील माता रुद्रायणी मंदिरात नवरात्रीत भाविकांची मोठी गर्दी होत आहे. रुद्रायणी गडावर धार्मिक वातावरणात देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा ओघ वाढला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बार्शीटाकळी : तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथील श्री रुद्रायणी माता संस्थानमध्ये शारदीय नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनाकरिता भाविकांची गर्दी वाढत असून, रुद्रायणी गडाच्या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

नैसर्गीक हिरव्यागार डोंगरावर शक्तिपीठाच्या मांदियाळीतील चौदावे शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणारे चिंचोली येथील गोल आकाराच्या गडावरील माता ‘रुद्रायणी देवी’ आदीशक्ती नावानेही प्रख्यात आहे.

माता रुद्रायणी देवी मातृत्वासोबतच शक्तीचेही प्रतीक आहे. अकोला शहरापासून अवघ्या ३० किमी अंतरावर असलेल्या श्री रुद्रायणी देवीचे दर्शन घेण्याकरिता महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनाकरिता येतात. देवीला साडी, चोळी, पिठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करीत परिवाराकरिता सुखी, संपन्न जीवनासाठी आशीर्वाद मागतात.

नवरात्रात नऊ दिवस संस्थानमध्ये सकाळी व संध्याकाळी आरती, भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम होतात. ता .६ ऑक्टोबर रोजी देवीच्या दर्शनासाठी अंदाजे ३० हजार भाविकांची गर्दी होती. मोठी गर्दी पाहून पुढील तीन-चार दिवसात गर्दी आणखीही वाढणार असल्याचे मंदिराच्या अध्यक्ष राजेद्र आकोत व उपाध्यक्ष डॉ. मनोहर दांदळे यांनी सांगितले. निर्सगाच्या हिरव्यागार सानिध्यात ३०० पेक्षा जास्त पायऱ्या असलेल्या रुद्रायणी गडावर नवरात्रात नऊ दिवस ‘उदो बोला उदो...

अंबाबाई माऊलीचा हो’च्या गजरात परिसर दणाणून जाते. भक्तांनी सांगितल्याप्रमाणे देवीचे मंदिर तसे हजारो वर्षे पूर्वीचे असून, याचा इतिहास फार जुना आहे. अजंठाच्या डोंगराचे शेवटचे ठिकाण हे रुद्र डोंगर असून, या रुद्र नावावरून देवीचे नाव रुद्रायणी म्हणून प्रसिद्ध झाले आहे. रुद्रायणी देवीच्या नावाची भागवत गीतामध्य नोंद आहे.

प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीता हे वनवासाला असताना दोन वेळा रुद्रायणी देवीच्या दर्शनासाठी आल्याचे रामविजय ग्रंथामध्ये पाचव्या अध्यायात १२८ व्या ओवीमध्ये नोंद आहे. एक आठवण म्हणून मनमोहक पांढऱ्या रंगाच्या कमळाचे फुले वाहून देवीची पूजा, आराधना त्यांनी केली आहे. देवीच्या पायथ्याशी पायाच्या आकाराच्या तलावाला पदमा तलाव म्हणून संबोधल्या जाते.

तलाव प्रभू श्रीरामचंद्र व सीतामाता ज्या ठिकाणी एकत्र फिरले त्या ठिकाणी ‘चंद्रविकास’ म्हणून ओळख्याल्या जाणारे कमळ आजही येथील तलावात उगवते. हे कमळ देवीचे मंदिर आणि अयोध्येत असे फक्त दोनच ठिकाणी पाहावयास मिळतात. देवीच्या मंदिरातील कमळ पुष्प फक्त रात्रीच्या उजेडातच उगवतात. दिवसा कमळ पुष्प उगवत नसल्याचे येथील पुजाऱ्यांनी सांगितले. नऊ दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी बार्शीटाकळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.

दररोज महाप्रसादाचे वाटप

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पंचक्रोशीतील सार्वजनिक दानदातांच्या वतीने रुद्रायणी येथे येणाऱ्या भाविकांकरिता दहा दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते ४ या वेळेत हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे. रविवारी (ता. ६) अंदाजे ३० हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दर्शानाकरिता येणाऱ्या भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन दानदात्यांकडून करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT