अकोला

माहेरी आलेल्या मुलीवर काळाचा घाला; अपघातात वडिलांसह ठार

सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) : माहेरी आलेल्या लेकीचा दवाखाना करून परत घराकडे जात असताना कुंभारी बायपासवर ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात वडील व मुलगी झार र झाले. ही घटना आज शनिवारी (ता. २५) घडली. या दुर्दैवी घटनेमुळे समाजमन हेलावले आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील नारायणखेड येथील रामप्रसाद चेके (वय ५३) हे माहेरी आलेल्या मुलीचा दवाखाना करून सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दुचाकीने घराकडे परत जाण्यासाठी निघाले. कुंभारी बायपास महामार्गावर चिखली कडून येणाऱ्या ट्रक क्रमांक आरजे १४ जीएन १८७२ ने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली.

या भीषण अपघातात वैशाली गणेश म्हस्के (वय २१) हिच्या डोक्यावर जबर मार लागल्याने जागीच ठार झाली तर रामप्रसाद चेके यांना ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जालना सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असता प्राणज्योत मालवली. बाप-लेकीचा अपघाती मृत्यू झाल्याने समाजमन हेलावले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला.

महामार्ग विभागाच्या चुकीने गेले अनेक बळी

देऊळगाव राजा बुलडाणा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग विभागाने बनविला आहे. सदर वळण रस्त्यावर जालना मार्ग टी पॉईंट, जाफराबाद चौफुली व कुंभारी टी पॉइंट वर अनेक अपघात घडले आहेत. तिन्ही ठिकाणी स्पीड ब्रेकर सूचना फलक आदी लावले नसल्याने दोन वर्षांत अनेकांचे बळी गेले. वाहतुकीसाठी सदर वळण रस्ता धोकादायक ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT