अकोला -नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चिखलगाव जवळ ट्रक -बलोनो कारचा अपघात; 3 जखमी Sakal
अकोला

अकोला -नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चिखलगाव जवळ ट्रक -बलोनो कारचा अपघात; 3 जखमी

सकाळ वृत्तसेवा

पातूर : अकोला -नांदेड राष्ट्रीय महामार्गावर चिखलगावजवळ ट्रक -कार अपघात 12.30 वाजता झाला. या अपघातामध्ये कारमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आमनेसामने ट्रक -कारमध्ये जोरदार धडक झाल्याने बलेनो कार मधील असलेले 3 इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती आपात्कालीन सेवेत नेहमीच धावून जाणारे पातुर येथील दुलेखा युसुफ खान यांनी दिली आहे दुलेखा युसुफ खान यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी रुग्णवाहिका वाहन चालक सचिन बारोकर व डॉक्टर फुरकान यांना दूरध्वनी वरून अपघात झालेल्या ठिकाणी बोलावून या अपघातातील जखमींनवर उपचाराकरिता अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.

जखमीपैकी चिखलगाव येथील यूवक भारतीय लष्करामध्ये असल्याची माहिती मिळत आहे व त्यांची नातेवाईक दोन मुले या गाडीत होते . कार क्र MH 30 BB7626, व ट्रक क्रमांक MH 12 FC 9099 क्रमांक आहे .हा चिखलगाव उड्डाणपुलाजवळ ट्रक व कार मध्ये समोरा-समोर धडक झाली, ट्रक जागेवरच उलटला आहे.

कारचे कमालीचे नूकसान झाले आहे. यावेळी पातुर पोलीस स्टेशनला माहिती मिळतात ठाणेदार किशोर शेळके व पातुर पोलिसांनी अपघात स्थळी घेऊन गंभीर जखमींना अकोला जिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके करीत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Retention : MS Dhoni अनकॅप्ड खेळाडू, परदेशी खेळाडूंवर बंदीची तलवार... BCCI ने जाहीर केले ८ महत्त्वाचे नियम

IND vs BAN 2nd Test : दुसऱ्या दिवसावर पडलं पावसाचं पाणी, भारतात ९ वर्षांनी पहिल्यांदाच असं झालंय

Manoj Jarange: यंदा मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'येथे' होणार भव्य-दिव्य कार्यक्रम, उद्या बीडमध्ये बैठक

IND vs BAN: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या कॅप्टन, तर 150 kmph वेगात बॉलिंग करणाऱ्या मयंक यादवलाही संधी

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार'' राज ठाकरेंनी मांडलं गणित

SCROLL FOR NEXT