Under the National Urban Livelihood Campaign, women self-help groups have achieved success in the industry.jpg 
अकोला

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत महिला बचत गटांच्या महिलांची उद्योगात भरारी

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर (अकोला) : केंद्र व राज्य शासन पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY- NULM) अंतर्गत शहरातील अल्प उत्पन्न गटातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिला उद्योगात उत्तुंग भरारी घेत आपल्या कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यात मोठी भूमिका बजावत आहेत.

हे अभियान नगर परिषद मार्फत राबविण्यात येत असून महिलांचे बचत गट, वस्तिस्तर संघ स्थापन करून त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देणे हा या अभियानाचा मुख्य भाग आहे. या माध्यमातून मूर्तिजापूर  शहरात १८५ बचत गटांची स्थापना करण्यात आली असून त्यांना राष्ट्रीयकृत बँकाना जोडून व्यवसाय उभारणी करिता दरवर्षी शासनाने ठरवून दिलेल्या उदिष्टानुसार व्याजावरील अनुदानित कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. त्यानुसार २०२०- २१ या आर्थिक वर्षात स्वयंरोजगार कार्यक्रम या घटकाअंतर्गत २९ बचत गटांना ३८ लाख ३० हजार व स्वयंरोजगार वैयक्तिक कर्ज योजने अंतर्गत १७ वैयक्तिक पुरुष व महिला लाभार्थ्यांना २० लाख ४६ रुपये कर्ज राष्ट्रीयकृत बँकामार्फत व्यवसाय करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, कॕनरा बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याची तसेच प्रधानमंत्री पथविक्रेता धोरण पी एम स्वनिधिअंतर्गत 235 पथविक्रेत्यांना दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अभियानाचे सहा. प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल यांनी यावेळी दिली. अभियानाचे शंभर टक्के उद्दिष्ट्य पूर्तता करण्याकरिता मुख्याधिकारी विजय लोहकरे, नगराध्यक्षा मोनालीताई गावंडे, उपनगराध्यक्ष सुनील पवार, महिला व बालकल्यण सभापती प्रतीक्षा मोहन वसुकार व सर्व नगरसेवकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

बचत गटांचे माध्यमातून महिलांनी शेवया, पापड़, बेंटेक्स ज्वेलरी, रेडीमेड गारमेंट, मसाला उद्योग, लेदर बॕग बनविणे, मास्क बनविणे इ. गृहउद्योग सुरु केले आहेत. महिला आपल्या कुटुंबांना आर्थिक हातभार लावत आहेत. वंदना दहिकर (उपाध्यक्ष रेणुकामाता महिला बचत गट केळकर वाड़ी) आणि ललीता शिर्के (बचत गट सदस्य सत्संग भवन) यांनी आपल्या घरी कमी जागेत स्वच्छता आणि कोरोना नियमाचे पालन करीत शेवया, नूडल्स, पापड व्यवसाय सुरु करुन एक आदर्श निर्माण केला आहे. 

आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याकरिता त्या अग्रेसर आहेत. त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी सहायक प्रकल्प अधिकारी राजेश भुगूल यांनी भेट देऊन त्यांचे मनोबल वाढविले. इतर महिला बचत गटांनी सुद्धा यांच्याकडून प्रेरणा घ्यावी व जास्तीत जास्त छोटे मोठे कुटीर, गृहउद्योग व्यवसाय उभारणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. बचत गटांच्या स्थापनेकरिता रुबीना परवीन समुदाय संघटिका, शिल्पा बोकडे, प्रतीक्षा मेश्राम यांनी मोलाचे सहकार्य केले. यापुढेही बचत गटांना या अभियानाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती शहर प्रकल्प अधिकारी तथा मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी यावेळी दिली.                                                            
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT