अकोला

Akola Crime: अंगणातच लावली होती गांजाची झाडं! पोलिसांची पडली नजर; तब्बल १२ किलो गांजा जप्त

सकाळ डिजिटल टीम

Akola Marijuana Plantation in House: दहिहांडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चोहट्टा बीटमध्ये करतवाडी येथे एका इसमाने चक्क घराच्या अंगणातच गांजाची झाडं लावली होती. ही माहिती पोलिसांना मिळताच कारवाई करीत तब्बल १२ किलो गांजा जप्त केला.
दहिहांडा पोलिस स्टेशन हद्दीत ता. २९ जानेवार रोजी ठाणेदार सहा पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे हे गस्तीवर असताना चोहट्टा बिट हद्दीतील करतवाडी येथे एका इसमाने गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली.

स्वतःचे घराचे अंगणात गांजा लावल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट यांना या संदर्भात माहिती दिली. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून पोलिस अधीक्षक यांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा करून एनडीपीएस कायद्या अंतर्गत कारवाईसाठी ठाणेदार योगेश वाघमारे यांनी एक पथक तयार केले.

उपविभागीय पोलिस अधिकारी अनमोल मित्तल हे स्वतः या पथकासोबत कारवाईत उपस्थित होते. पोलिस पथकाने करतवाडी येथे कारवाई करीत अजाबराव रामदास किरडे (४६ वर्ष) याच्या घराच्या परिसराची पाहणी केली. तेव्हा त्याने स्वतःचे घराचे अंगणात कंपाउंड वॉलचा आडोसा घेवून १२ गांजाची झाडे लावल्याचे आढळले. (Latest Marathi News)

पोलिस पथकाने झाडांचा पंचासमक्ष पंचनामा करून १२ किलो वजनाची सुमारे एक लाख २० हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे ताब्यात घेतली. आरोपी अजाबराव किरडे याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक बच्चनसिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे व सह पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे, पोउपनि अरून मुंढे, एएसआय अंबादास नेरकर, पोलिस कर्मचारी गोपाल अघडते, सुधाकर सिरसाट, शरद सांगळे, अनिल भांडे, कमोद लांडगे, योगेश करनकार, रामेश्वर भगत, निलेश देशमुख, श्रध्दा वानखडे, एएसआय प्रकाश महाजन, सुधीर कोरडे, हेमंत दासरवार यांनी केली.

(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS W vs SA W: गतविजेता ऑस्ट्रेलिया 15 सामन्यानंतर मोक्याच्या क्षणी हरला; दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला

Hamas Chief Death: हमास प्रमुख याह्या सिनवर इस्राईल लष्कराच्या हल्ल्यात ठार; पंतप्रधान नेत्यानाहूंची घोषणा

Baba Siddiqui Case: मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आरोपी शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तरच्या विरोधात लुक आउट सर्कुलर जारी

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT