Warning farmer self-immolation Alleged harassment bank manager akola sakal
अकोला

शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा; बँक व्यवस्थापकावर त्रास देत असल्याचा आरोप

माझी तक्रार कुठेही केली तरी मी तुमचे बँकेतील पैसे देणार नाही, असा इशारा देऊन शाखा व्यवस्थापकाने अपमानित केल्‍याचा आरोप कोथळकर यांनी केला

सकाळ वृत्तसेवा

सूनगाव : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या जामोद शाखेच्या व्यवस्थापकावर अपमान केल्याचा व त्रास दिल्याचा आरोप करून सुनगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील रमेश किसन कोथळकार हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांचे जामोद येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेमध्ये बचत खाते आहे. २० एप्रिल रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास ते खात्यामधून पीएम किसान निधीचे पैसे काढण्याकरिता गेले होते. त्यांनी विड्रॉल भरून बॅंकेत दिला असता बँकेचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र पाटील कोथळकार यांनी त्याला अगोदर थकीत कर्जाची रक्कम भरण्यास सांगितले.

कर्जाची रक्कम न भरल्यास तूला बँकेतून एक रुपयाही मिळणार नाही. तसेच माझी तक्रार कुठेही केली तरी मी तुमचे बँकेतील पैसे देणार नाही, असा इशारा देऊन शआखा व्यवस्थापकाने अपमानित केल्‍याचा आरोप कोथळकर यांनी केला आहे. यापूर्वीही कोथळकार यांचे कर्जमाफी यादीत नाव आले होते. मात्र, व्यवस्थापक पाटील यांनी चुकीची माहिती पुरवून त्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले. बॅंकेत बचत खाते असलेल्या बचत गटाच्या महिलांवर दबाव आणून गटातून कोथळकार यांच्या पत्नीला काढण्यास सांगितले. कोथळकर हे कर्ज वेळेवर भरत नाहीत तर गटामधील कर्ज काय भरतील, असे म्हणून त्यांनी कोथळकार यांच्या पत्नीस बचत गटामधून काढण्यास लावल्‍याचा आरोप कोथळकर यांनी केला असून, न्याय न मिळाल्यास त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

रमेश कोथळकर यांचे बॅंकेच्या आमच्या शाखेत कर्ज खाते आहे. ते एनपीएमध्ये गेले आहे. ते खाते ओटीएसच्या माध्यमातून नियमित करण्याचा त्यांना सल्ला दिला. त्यांच्या कर्जमाफीबद्दल कोणतीही चुकीची माहिती मी वरिष्ठांना सादर केली नाही. कर्जमाफीची माहिती शासनाकडे २०२० मध्ये गेली आणि मी या शाखेला २०२१ मध्ये आलो. त्यामुळेकोथळकर यांनी केलेले आरोप धांदात खोटे आहे.

- राजेंद्र पाटील, शाखा व्यवस्थापक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, जामोद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT