मालेगाव (जि.वाशिम) ः जऊळका येथे बसस्थानकाजवळ वास्तव्यास असलेल्या नाथ जोगी समाजातील काही महिला व पुरुषांनी गावा लगतच्या शेतातून माती का आणली ? म्हणून शेतकरी व नाथजोगी यांच्यात किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामध्ये शेतकऱ्याला मारहाण केली ही माहिती शेतकऱ्याने पोलिस स्टेशनला देताच उपस्थित पोलिस कर्मचारी ताफ्यासह घटनास्थळी समजविण्यासाठी गेले असता, नाथजोगी महिला-पुरुष जमावाने पोलिस कर्मचारी व पत्रकारावर हल्ला करून त्यांना मारहाण केली. (Washim; Fighting in two groups at Jaulka Railway)
झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होताच वातावरण शांत करण्यासाठी येथील ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी अतिरिक्त पोलिस कुमक बोलावून जिल्हा पोलिस अधीक्षक, सहाय्यक पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरपूर-मंगरुळपीर-कारंजा-वाशीम येथून मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी बोलाविला. इतिहासात पहिल्यांदाच गावाला छावणीचे स्वरूप आले असून, गावात तणावपूर्ण शांतता असून दोन्ही गटातील परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी दहा ते पंधरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
Washim; Fighting in two groups at Jaulka Railway
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.