वाशीम : येथील जिल्हा परिषदेत कनिष्ठ लिपीकाने थकीत वेतन काढण्यासाठी चाळीस हजाराची लाच मागीतली होती. तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर लिपीकास रंगेहाथ अटक केली.
यातील तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २४ फेब्रुवारी रोजी पडताळणी केली असता आरोपी अमोल रामदास कोकाटे कनिष्ठ सहायक, याने तक्रारकर्त्याला त्यांचे प्रलंबित असलेले ४ महिन्याचे थकित वेतन काढून देण्याकरिता ५५ हजार रुपयांची मागणी करून पगाराचे आरटीजीएस करण्यापूर्वी ४० हजार रुपये देण्याचे तसेच वेतन जमा झाल्यानंतर उर्वरीत १५,००० रूपये देण्याचे ठरले.
यावरून आज सापळा कारवाईचे आयोजन केले असता आरोपी अमोल कोकाटे यांनी तक्रारकर्त्याकडून लाच रक्कम ४० हजार रुपये स्वीकारल्याने आरोपी लोकसेवकाला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वी. अमरावती परिक्षेत्र, अमरावती गजानन शेळके पोलिस उपअधिक्षक ला. प्र. वि. वाशीम यांच्या मार्गदर्शनात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.