road Citizens  sakal
अकोला

अकाेला : कर भरणार नाही; रस्ता आम्हीच दुरुस्त करतो!

पाच वर्षांपासून रस्त्‍याच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक संतप्त

मनोज भिवगडे

अकोला : एकीकडे वाढलेला मालमत्ता कर आणि दुसरीकडे खड्डेमय रस्त्यातून काढावे लागलेले पाच वर्ष. याही परिस्थितीत संयम ठेवून असलेल्या नागरिकांना निवडणुकीच्या वर्षात तरी रस्ता दुरुस्त करून मिळण्याची अपेक्षा होती. आंदोलन केले, फलकही झळकले, मात्र, रस्‍त्‍याची अवस्था आहे तशीच. त्यामुळे आता आक्रमक झालेल्या नागरिकांनी महानगरपालिकेला इशारा देत मालमत्ता कराचा भरणा न करता, आमचा रस्ता आम्हीच दुरुस्त करून घेतो, अशी भूमिका घेतली आहे.

मनपातील सत्ताधारी भाजपकडून एकीकडे शहरातील रस्ते विकासाचा दावा करीत असले तरी अनेक भागात आजही रस्ता म्हणावे इतपतही चांगले रस्ते नाही. खड्ड्यातून अनेक वर्षांपासून नागरिक ये-जा करीत आहेत.

त्यामध्ये गौरक्षण रोड परिसरातील रस्त्यासह विद्यानगर, सहकारनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. या रस्‍त्यांसाठी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनही करण्यात आले होते.

जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी ‘मी रस्ता बोलतोय म्हणून’ फलकही या रस्त्यांवर झळकविले होते. परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांना अनेकवेळा निवेदने देवून रस्ता दुरुस्तीची मागणीही केली होती. मात्र, पाच वर्षांचा कार्यकाळ उलटून गेल्यानंतरही रस्ते आहे त्याच अवस्थेत असल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे आता मालमत्ता कर भरता, आमचा रस्ता आम्हीच दुरुस्त करून घ्यावा का, असा प्रश्न उपस्थित करीत नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे प्रशासनाकडून या रस्त्यांबाबत कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप-शिवसेनेच्या राजकारणात विकासाचा चुराडा!

अकोला शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी १५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून घेतला होता. मात्र, राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर हा १५ कोटीचा निधी शिवसेना आमदारांनी इतत्र वळविला. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. यावर सुनावणी सुरू आहे. याच निधीतून गोरक्षण रोड परिसरातील या चारही रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असल्याची माहिती आहे.

असाही विरोधाभास!

रस्त्याची परिस्थिती चांगली असतांना व रस्त्यावर कोणत्याही दुरुस्तीची गरज नसतांना केवळ ठेकेदाराकडून कमिशन मिळवण्याच्या उद्देशाने चांगल्या रस्त्यावर पुन्हा कॉंक्रीट टाकून महानगरपालिकेचे नुकसान करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सरस्वती नगरवासीयांनी केला असून, त्याबाबत आयुक्तांना निवेदन सादर केले. शहराच्या अनेक भागातील रस्ते अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वारंवार मागणी करूनही हे रस्ते आतापर्यंत झालेले नाहीत. असे असताना संत तुकाराम चौकापासून जवळच असलेल्या सरस्वतीनगरमध्ये मात्र रस्त्याचे स्थिती चांगली असताना व या रस्त्यावर कोणत्याही दुरुस्तीची गरज नसतांनाही या रस्त्यावर पुन्हा कॉंक्रीट टाकले जात असल्याचे निवेदन सरस्वती नगर मधील नागरिकांनी दिले आहे.

''गेले अनेक वर्षांपासून रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती झाली आहे. आंदोलन करून विनवणी, निवेदन देवूनही काहीही फरक पडला नाही. त्यामुळे आता मालमत्ता कर न भरता आमचा रस्ता आम्हीच दुरुस्त करून घेव, असे प्रशासन व मनपातील सत्ताधाऱ्यांना बजावून सांगितले आहे.''

- पंकज साबळे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

''आम्ही महानगरपालिका क्षेत्रात रहतो का, असा प्रश्न रस्त्यांची स्थिती बघितल्यानंतर पडतो. रस्त्यावरील धुळीमुळे २४ तास दरवाजे-खिडक्या बंद ठेवाव्या लागतात. दहा फुटही रस्त्या चांगल्या स्थितीत नाही. तीन वर्षांपासून चार-चार नगरसेवकांकडे विनवण्या केल्यात. मात्र, कुणीही लक्ष दिले नाही.''

- आनंद सुकळीकर, नागरिक, गौरक्षण रोड ते सिंधी कॅम्प चौक परिसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT