कुरूम (जि. अकोला) : राष्ट्रीय महामार्गावरील नवसाळ शिवारातील शेर-ए-बिहार धाब्यावरील कामगाराने किरकोळ वादातून धाबा मालकाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना सोमवार, २६ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास धाब्यालगत असलेल्या शेतात घडली.
प्राप्त माहितीवरून, राष्ट्रीय महामार्गावरील आलमभाई यांचा शेर-ए-बिहार धाबा असून, त्यावर गेल्या ४ ते ५ वर्षांपासून ३५ वर्षीय आरोपी कामगार हा मोलमजुरी करून धाब्यावरच राहायचा. सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आरोपी कामगार हा धाब्यासमोर कुऱ्हाडीने लाकडं फोडत असतांना आरोपी कामगार व धाबा मालक मो. शोएब अन्सारी (रा. बिहार, वय-३८ वर्ष) या दोघांमध्ये काही कारणावरून किरकोळ शाब्दिक वाद झाला.
यावेळी आरोपी कामगार हा कुऱ्हाड घेऊन धाबा मालकाला मारण्यासाठी पाठीमागे धावला. शोएब हा धावतांना खाली कोसळला असता आरोपी कामगाराने शोएबच्या डोक्यावर कुऱ्हाडीने ३ ते ४ वार केल्याने गंभीर जखमी होऊन व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती माना पोलिसांना मिळताच ठाणेदार कैलास भगत, उपनि. घनश्याम पाटील हे आपल्या सहकारी एएसआय दिलीप नागोलकर, राजेश डोंगरे, उमेश हरमकर, महेश पिंजरकर, आकाश काळे, संदीप सरोदे, जयकुमार मंदावरे, वाहन चालक मनोहर इंगळे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून आरोपीस अटक केली.
घटनास्थळाचा पंचनामा करून शोएबचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.निरीक्षक संतोष महल्ले, आय कार युनिट यांनी भेट दिली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.