Blood-Bank sakal
अकोला

Blood Bank : अपघात झालेल्या तरुणाचा रक्ताअभावी मृत्यू? रक्तपेढ्यांमध्ये ‘ए’ पॉझिटिव्हचा तुटवडा

मित्राचा अपघात झाल्यानंतर इतर मित्रांनी त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी अर्जंट ए पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - मित्राचा अपघात झाल्यानंतर इतर मित्रांनी त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी अर्जंट ए पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. मात्र, सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय गाठले कुठेही ए पॉझिटिव्ह रक्त उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी सर्वच खाजगी रक्तपेढ्यांच्या ठिकाणी चौकशी केली डोनर उपलब्ध असतानाही ए पॉझिटिव्ह रक्त उपलब्ध झाले नाही. अखेर पहाटे चारच्या सुमारास अपघातग्रस्त युवकाचा मृत्यू झाला. याबाबत जिल्हाधिकारी व शल्य चिकित्सक यांच्याकडे मृताचे नातेवाईक तक्रार करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील रहिवाशी दत्तात्रय पुरुषोत्तम भोंडे (२२) या युवकाचा मंगळवारी (ता.१६) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास अपघात झाला.त्याला तेथील डॉक्टरांनी अकोल्याला संदर्भित केले. येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर रात्री १२ च्या सुमारास उपचार सुरू झाले. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी सदर रुग्णाला रक्ताची अंत्यत आवश्यकता असल्याचे नातेवाईकांना कळविले.

त्यानंतर अपघातग्रस्त युवकाच्या अकोल्यातील परिचित मित्रांनी सर्व रक्तपेढ्यांकडे जावून ए पॉझिटिव्ह रक्ताची मागणी केली. मात्र सदर रक्तगट रक्त कुठेच उपलब्ध झाल्याने अखेर रुग्णाचा पहाटेच्या सुमारास जीव गेला. त्यामुळे डोनर उपलब्ध असतानाही वेळेवर रक्त अकोल्यात मिळत नसेल तर ही बाब इतर रुग्णांसाठी देखील चिंताजनक आहे. खरंच रक्तसाठा नव्हता कि तो उपलब्ध करुन देण्यात आला नाही, याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार

शासकीय व खाजगी रक्तपेढ्यांकडे ए पॉझिटिव्ह रक्त साठा नसल्याचे सांगण्यात आले. खरच रक्तपेढ्यांकडे त्या दिवशी रक्त साठा नव्हता का? या रक्तपेढ्यांचे त्या दिवशीचे स्टॉक रजिस्टर तपासण्यात यावे व आवश्यक रक्तसाठा उपलब्ध करून देण्यात यावा. उद्या दुसऱ्यावर अशी परिस्थिती येणार नाही. यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे रुग्णाचे नातेवाईक गुरुवारी तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

शहरातील खाजगी तसेच सरकारी रक्तपेढ्यांकडे ए पॉझिटिव्ह रक्ता संदर्भात मागणी केली होती. डोनर असताना कोणीही रिस्पॉन्स दिला नाही. सदर रक्तगटाची टंचाई असेल मात्र एकाही रक्तपेढी ए पॉझिटिव्ह रक्तगट सापडू नये याबाबत शंका आहे.

- नंदकिशोर धुमाळे, अकोला, मृतकाचा नातेवाईक

खासगी रुग्णालयांकडे साठा शिल्लक आहे की नाही, याची माहिती नाही. आमच्याकडे कोणती तक्रार आली नाही.

- तरंगतुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला

जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा आहे. रुग्णांना गरज असते तेव्हा अनेक अडचणी येतात. रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी समोर यावे व रक्तदान करावे.

-विपुल माने, संस्थापक, श्री.छत्रपती रक्तमित्र संघटन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT