Youth dies in bus accident Buldhana crime news 
अकोला

पुण्याहून आला काळ : विधवा आईसह लहान भावाच्या डोक्यावरचे छत्र क्षणार्धात हरवले

विनोद खरे

चिखली (जि. बुलढाणा) : कोरोनाचे संकट आणि शासकीय निर्बंधामुळे अनेकांवर रोजगारासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. परंतु, काही तरुणांनी परिस्थितीसोबत दोन हात करण्याचे ठरवीत इतरांच्या रोजगारावर नोकरी करून घर चालविण्यापेक्षा स्वत: काही उभे करून दोन पैसे जास्तीचे मिळविण्याचा आटापिटा सुरू असतो. परंतु, हा आटापिटा कधी जिवावर बेतू शकतो यांची तूर्तास कल्पनाही नसते. अशीच घटना शनिवारी (ता. १३) चिखली तालुक्यातील पेठ नजीक घडली आणि आईसह लहान भावाच्या डोक्यावरच छत्र क्षणार्धात हरवले.

दररोजचा रोजगार आणि त्यातून कमाई करून उदरनिर्वाह करण्याची धडपड करणारा मेहनती युवक म्हणून किशोर इंगळे याची ओळख. कोरोना काळात घरोघरी ऑटोरिक्षावर दळण दळण्यासाठी बसवलेली चक्की हेच या मंदीच्या काळात उदरनिर्वाहाचे साधन बनले. घरी वृद्ध आई आणि लहान भावाचा सांभाळ करीत तो रोजगार करत होता. वडिलांचे छत्र हरविल्याने सर्व जबाबदारी समर्थपणे सांभाळत होता.

यातच चिखली तालुक्यातील पेठ येथे काळाने घाला घातला. पुण्याकडून भरधाव वेगाने येणारी खासगी बस क्रमांक एमएच १२ एसएफ ७०११ या गाडीने दळणाची गिरणी लावलेल्या अ‍ॅपेला वळण घेतेवेळी जोरदार धडक दिली. यात अ‍ॅपेचालक किशोर गजानन इंगळे (वय २४ वर्ष, रा. उत्रादा ता. चिखली) हा रस्त्याच्या दुभाजकावर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाला. किशोर याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. लगेच त्याला उपचारासाठी चिखली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अचानक ओढवलेल्या संकटात होतकरू किशोर गेल्याने गावात सर्वांचे मने सुन्न झाली. घरातील कर्ता पुरुष तोच होता. किशोरच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाल्याने आई आणि छोट्या भावाचा तोच आधार होता. या अपघाताने तो आधारच हरविल्याने सर्वत्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. किशोर याने गहू चाळणी करण्याचे यंत्र घेतले होते. ते यंत्र त्याने अ‍ॅपेला जोडले आणि त्यातून रोजगार निर्मिती केली होती.

वेगावर नियंत्रणच नाही

ज्या प्रमाणे महामंडळाच्या एसटीवर वेग नियंत्रण बसविण्यात आलेले असते त्या प्रमाणे खासगी लक्झरी बसेसवर नसते. सुसाट वेगाने लक्झरी चालक गाडी धावत असतात. विशेष म्हणजे गाव आल्यानंतरही त्याचा वेग मर्यादित नसल्यामुळे अनेकदा अपघाताला कारणीभूत ठरत असतात. परंतु, याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करून वेग मर्यादेची अंमलबजावणीकडे कानाडोळा करीत असतात. परंतु, अशा घटनांमधून कुणाच्या घरचा आधारवडच हिरावला जात असले याची कल्पनाही त्यांना नसावी. त्यामुळे या नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT