शेअर्स  esakal
अर्थविश्व

मजबूत फंडामेंटल्सचे 5 शेअर्स वर्षभरात देतील 73 टक्के परतावा, तज्ज्ञांना विश्वास

सकाळ डिजिटल टीम

Stocks To Buy: रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील बाजारांसह देशांतर्गत बाजारातही प्रचंड अस्थिरता आहे. त्यामुळे, जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओसाठी दर्जेदार स्टॉक्स शोधत असाल, तर तुम्ही मजबूत फंडामेंटल्स असलेल्या शेअर्सचा विचार करु शकता. ब्रोकरेज फर्म शेअरखानने (Sharekhan) लाँग टर्मच्या दृष्टीकोनातून 5 शेअर्सवर विश्वास व्यक्त केला आहे.

गोदरेज कंझ्युमर (Godrej Consumer)

गोदरेज कंझ्युमरबाबत ब्रोकरेजने 'बाय' रेटिंग दिले आहे ज्याचे टारगेट 1150 रुपये ठेवले आहे. 7 मार्च 2022 ला गोदरेज कंझ्युमरच्या शेअरची किंमत सुमारे 664 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीवरून सुमारे 73 टक्के प्रति शेअर परतावा मिळू शकतो.

गेल (GAIL)

शेअरखानने गेलवर (GAIL) बाय रेटींग देत 196 रुपयांचे टारगेट दिले आहे. 7 मार्च 2022 रोजी, या शेअरची किंमत सुमारे 162 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीवरून सुमारे 20 टक्के प्रति शेअर परतावा मिळू शकतो.

जेके लक्ष्मी सिमेंट (JK Lakshmi Cement)

जेके लक्ष्मी सिमेंटबाबतही गुंतवणुकीचा सल्ला देत टारगेट 680 रुपये दिले आहे. 7 मार्च 2022 ला, जेके लक्ष्मी सिमेंटच्या शेअरची किंमत सुमारे 401 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीवरून सुमारे 69 टक्के प्रति शेअर परतावा मिळू शकतो.

कमिन्स इंडिया (Cummins India)

शेअरखानकडे कमिन्स इंडियाच्या शेअर्सवर लाँग टर्मसाठी 1252 रुपयांच्या टारगेटसह 'बाय' रेटिंग दिले आहे. 7 मार्च 2022 ला कमिन्स इंडियाच्या शेअरची किंमत सुमारे 946 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीवरून सुमारे 32 टक्के प्रति शेअर परतावा मिळू शकतो.

टेक महिंद्रा (Tech Mahindra)

शेअरखानने टेक महिंद्रावर खरेदीचा सल्ला देत 2060 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. 7 मार्च 2022 ला टेक महिंद्राच्या शेअरची किंमत सुमारे 1424 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीवरून सुमारे 44 टक्के प्रति शेअर परतावा मिळू शकतो.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT