7th Pay Commission News esakal
अर्थविश्व

आनंदाची बातमी! 1 जुलैपासून कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ, जाणून घ्या कसं

सकाळ डिजिटल टीम

पगाराबाबत केंद्र सरकार लवकरच एक मोठी घोषणा करणार आहे.

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार लवकरच एक मोठी घोषणा करणार आहे, ज्याचा फायदा सुमारे 1.25 कोटी लोकांना होणार आहे. केंद्र सरकार आता लवकरच महागाई भत्ता (DA) वाढवणार असून त्याची कर्मचारी आतुरतेनं वाट पाहत आहेत. केंद्र सरकार महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारकडून (Central Government) वेळोवेळी सरकारी कर्मचाऱ्यांचे (Government Employees) जीवमान सुधारावे यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जातात. गेल्या काही महिन्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्यात आलीय. तुम्हीही केंद्र सरकारसाठी काम करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पगारवाढीच्या (Salary Increase) प्रतीक्षेत असलेल्या देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार मोठी भेट देणार आहे.

1 जुलैपासून सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याची घोषणा केलीय. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जुलैपासून वाढणार आहे. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जाहीर करण्यात आलीय. म्हणजेच, आतापर्यंत ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के दरानं महागाई भत्ता मिळत होता, तो आता 38 टक्के होणार आहे.

जर तुमचा किमान मूळ वेतन 18 हजार रुपये दरमहा असेल तर तुम्हाला वार्षिक 38 टक्के दरानं 6840 रुपये महागाई भत्ता मिळेल. म्हणजेच, प्रत्येक महिन्यानुसार तुमचा पगार 720 रुपयांनी वाढेल. तुमचा पगार वार्षिक आधारावर 8,640 रुपयांनी वाढेल. दुसरीकडं जर आपण कमाल पगाराबद्दल बोललो, तर 56,900 रुपयांच्या मूळ पगारावर 38 टक्के दरानं वार्षिक 21,622 रुपये महागाई भत्ता मिळेल. म्हणजेच महिन्यानुसार पाहिल्यास पगार 2,276 रुपयांनी वाढेल. त्यानुसार वार्षिक पगारात 27,312 रुपयांची वाढ होणार आहे.

एआयसीपी इंडेक्सच्या (AICP Index) आकडेवारीनुसार, 'जानेवारी महिन्यात महागाईचा आकडा 125.1 होता, तर फेब्रुवारीमध्ये 125 होता. याशिवाय मार्चबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात ती वाढून 126 झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तो 126 वर गेला, तर सरकारकडून डीएमध्ये 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT