Federal Reserve Rate Hike sakal
अर्थविश्व

अमेरिकेच्या फेड रिझर्व्हच्या व्याजदरात वाढ; तुमच्या खिशावर असा होणार परिणाम

व्याजदरात आक्रमक वाढ केल्यामुळे आर्थिक मंदीचा धोका समोर येऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात होती

सकाळ डिजिटल टीम

US Fed Interest Rates Hike: अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. यासोबतच फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे की, अमेरिकेतील व्याजदर पुढील वर्षी 5.1 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

अमेरिकेतील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने गेल्या अनेकवेळा 75 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे, त्यानंतर व्याजदरात आक्रमक वाढ केल्यामुळे आर्थिक मंदीचा धोका समोर येऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात होती.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

यूएस फेड रिझर्व्हने बुधवारी रात्री ही दरवाढ जाहीर केली. या दरवाढीच्या घोषणेसोबतच फेड रिझर्व्ह हाईकने असेही म्हटले आहे की, 2023 मध्ये महागाई कमी करण्यासाठी फेड रिझर्व्ह यापुढेही व्याजदर वाढवत राहील. 2023 च्या अखेरीस, फेड रिझर्व्ह 0.75 टक्क्यांपर्यंत व्याजदरात वाढ नोंदवू शकते. विशेष म्हणजे याआधीही यूएस फेड रिझर्व्हने सलग चार वेळा व्याजदरात वाढ केली आहे. फेड रिझर्व्हनंतर आज युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंडचीही बैठक आहे.

अमेरिकेतील व्याजदर वाढल्याने भांडवली बाजारावर परिणाम होईल. अमेरिकन गुंतवणूकदार भारताच्या शेअर बाजारातून पैसे काढू शकतात, यामुळे बाजारात विक्री वाढू शकते. अमेरिकेतील व्याजदर वाढल्याने डॉलर मजबूत होईल आणि रुपया कमकुवत होईल, ज्यामुळे आयात करणे महाग होऊ शकते. परदेशी गुंतवणूकदार भारतासारख्या अनेक बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करतात. भारताच्या भांडवली बाजारात एकूण 13 टक्के गुंतवणूक परदेशातून येते.

अमेरिकन बाजारात घसरण :

फेड रिझर्व्हच्या व्याजदरात वाढ करण्याच्या निर्णयाचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून येतो. बुधवारी डाऊ जोन्सने 0.42 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली. फेड रिझर्व्हमध्ये वाढ झाल्यानंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारातही घसरण दिसून येऊ शकते.

भारतीय बाजारात घसरण :

यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्याने जागतिक बाजार घसरले आहेत, त्यामुळे भारतीय बाजारही घसरणीसह उघडले आहेत. BSE सेन्सेक्स 74 अंकांसह 62603 वर उघडला, तर निफ्टीने 18 अंकांच्या घसरणीसह 18642 वर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT