Crypto Currency Updates sakal media
अर्थविश्व

क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठी घसरण; परंतु एका चलनात 900% पेक्षा जास्त वाढ

Cryptocurrency Prices Today: क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठी घसरण झाल्याने अनेक चलनं कोसळली; परंतु एका चलनात 900% पेक्षा जास्त वाढ

सकाळ डिजिटल टीम

Cryptocurrency Prices Today:

गुरुवार, 6 जानेवारी 2022 रोजी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये (Cryptocurrency Market) मोठी घसरण झाली. गेल्या 24 तासांत जागतिक क्रिप्टो बाजार 8.70 टक्क्यांनी घसरला. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10:20 वाजता, जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप 2.04 ट्रिलियन डॉलर इतके होते, जे काल 2.23 ट्रिलियन डॉलर होते. सर्व प्रमुख क्रिप्टोकरन्सीमध्ये लक्षणीय घट झाली. सर्वात मोठी घसरण सोलानामध्ये (Solana) दिसून आली आणि त्यानंतर सर्वात तुटलेल्या नाण्यांमध्ये इथरियम (Ethereum) आणि बिटकॉइनचा (Bitcoin) समावेश आहे.

गुरुवारी सकाळपर्यंत सर्वात मोठी करंसी बिटकॉइनमध्ये (Cryptocurrency prices today) 7.65% ने घसरली, तर इथरियम (Ethereum prices today) 9.63% ने घसरली. मात्र, टिथरमध्ये (Tether) कोणताही बदल झाला नाही. सोलानामध्ये 11.79% ची घसरण दिसली, तर बिनांस कॉइन (Binance Coin) 9.38% ने घसरला.

कोणत्या करंन्सीमध्ये किती घसरण झाली (How much did the currency fall?)-

बिटकॉइन 7 टक्क्यांहून अधिक खाली $43,051.43 वर ट्रेड करत होता. कालच्या $879 अब्जच्या तुलनेत त्याचे बाजार मूल्य $811 अब्ज पर्यंत घसरले. Bitcoin (Bitcoin prices today) ने गेल्या 24 तासात $42,761.46 चा निचांक आणि $46,929.05 चा उच्चांक केला आहे. 9 टक्क्यांहून अधिक घसरण होऊन इथेरियम (Ethereum Price Today) $3,458.27 वर ट्रेड करताना दिसला, Ethereum ने गेल्या 24 तासात $3,432.90 चा निचांक आणि $3,842.06 चा उच्चांक नोंदवला आहे. त्याचे मार्केट कॅप 24 तासांपूर्वी $448 अब्ज होते ते $410 बिलियनवर आले आहे.

Binance Coin देखील 8 टक्क्यांनी घसरून $466.79 वर ट्रेड करत आहे. सर्वात मोठी घसरण सोलानामध्ये दिसून आली आणि ती 11 टक्क्यांहून अधिक घसरून $149.39 वर आली, त्याची किंमत 24 तासांपूर्वी $168.71 होती.

क्रिप्टो नाव किंमत बदल (+/-) मार्केट कॅप

बिटकॉइन $43,051.43 -7.65% $879 अब्ज

इथरियम $3,473.64 -8.74% $410 अब्ज

सोलाना $150.26 -10.80% $45,972,979,981

कार्डानो $1.23 -7.73% $40,489,864,720

XRP $0.7641 -7.92% $35,883,290,440

टेरा लुना $77.41 -9.27% ​​$27,219,160,646

DogeCoin $0.157 -7.40% $20,620,756,273

शिबा इनू $0.000003008 -7.88% $16,251,437,525

पोल्काडॉट $26.19 -10.97% $25,419,195,066

आज टॉप गेनर क्रिप्टोकरन्सी (Top Gainer Cryptocurrencies Today)-

गेल्या 24 तासात सर्वात वेगाने वाढणाऱ्या चलन/टोकन्सबद्दल बोलायचं झालं, तर LUNI मध्ये तब्बल 943.96% ची जबरदस्त वाढ झाली आहे. मूनरॉकमध्ये (MoonRock) 379.34 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. यानंतर, Brainiac Farm (BRAINS) मध्ये 343.47% ची उडी नोंदवली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT