फोर्ब्सनं श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली आहे.
Forbes’s 2022 List : फोर्ब्सनं श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली असून अपेक्षेप्रमाणं गौतम अदानी (Gautam Adani) यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवलाय. त्यांनी मुकेश अंबानींना (Mukesh Ambani) मागं टाकून प्रथम क्रमांक पटकावलाय.
शेअर बाजारात कंपनीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं Nykaa च्या प्रमुख फाल्गुनी नायर (Falguni Nayar) यांनी प्रथमच या यादीत स्थान मिळवलंय. तर, दुसरीकडं स्टॉक क्रॅशमुळं पेटीएमचे विजय शेखर शर्मा हे भारतातील टॉप 100 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.
शेअर्सच्या दमदार कामगिरीच्या जोरावर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती जवळपास दुप्पट होऊन $150 अब्ज झाली आहे. त्याच वेळी 2013 पासून देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पदावर असलेले मुकेश अंबानी 2022 मध्ये $ 88 अब्ज संपत्तीसह मागे पडले आहेत. गेल्या वर्षी त्यांची एकूण संपत्ती $92.7 अब्ज होती. फोर्ब्सच्या यादीनुसार, देशातील 100 सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती $600 अब्जच्या जवळपास आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात $25 अब्जची वाढ झालीय.
राधाकृष्ण दमाणी आणि त्यांचं कुटुंब 27.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. सायरस पूनावाला 21.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर, शिव नाडर 21.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 16.4 अब्ज डॉलर्स आहे. सहाव्या स्थानावर सावित्री जिंदाल आणि त्यांचं कुटुंब, तर 15.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सातव्या स्थानावर दिलीप सांघवी आणि त्यांचं कुटुंब आहे. 15.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह हिंदुजा बंधू आठव्या स्थानावर आहेत. कुमार बिर्ला 15.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 9 व्या स्थानावर आहेत. परंतु, बजाज कुटुंब 14 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दहाव्या स्थानावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.