Adani Group Sakal
अर्थविश्व

Adani Group : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाचे 100 अब्ज डॉलर पाण्यात! मोदी सरकारने सोडले मौन, म्हणाले..

गेल्या आठवड्यात आलेल्या 'हिंडेनबर्ग रिसर्च'च्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Adani Enterprises FPO : अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर लावलेल्या फसवणुकीच्या आरोपांवर केंद्रातील मोदी सरकारने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी समूहाला 100 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

याबाबत आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांना विचारले असता त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, "आम्ही सरकारमध्ये आहोत आणि कोणत्याही खासगी कंपनीशी संबंधित समस्यांवर प्रतिक्रिया देत नाही." मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) व्ही अनंत नागेश्वरन यांनीही यासंदर्भात वक्तव्य करण्यास नकार दिला होता.

गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा :

अदानी एंटरप्रायझेसने 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ मागे घेण्याची आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा केली आहे. मात्र, मंगळवारी कंपनीचा एफपीओ पूर्णपणे सबस्क्राइब झाला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

अमेरिकन शॉर्टसेलिंग कंपनी हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर अदानी एंटरप्रायझेसने हे पाऊल उचलले आहे. BSC डेटानुसार, अदानी एंटरप्रायझेसच्या FPO अंतर्गत 4.55 कोटी शेअर्स ऑफर करण्यात आले होते, तर 4.62 कोटी शेअर्ससाठी अर्ज प्राप्त झाले होते.

96.16 लाख समभागांना तिप्पट बोली मिळाली :

गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या 96.16 लाख समभागांसाठी जवळपास तिप्पट निविदा प्राप्त झाल्या. त्याच वेळी, पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या विभागातील 1.28 कोटी समभाग पूर्णतः सबस्क्राइब झाले.

किरकोळ गुंतवणूकदार आणि कंपनी कर्मचार्‍यांकडून एफपीओला मिळालेला प्रतिसाद चांगला नव्हता. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे ​​अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, "गेल्या आठवड्यात कंपनीच्या स्टॉकमध्ये उच्च अस्थिरता असतानाही मंगळवारी एफपीओ यशस्वीरित्या बंद झाला.

कंपनी आणि तिच्या व्यवसायावरील तुमचा विश्वास हा आमचा आत्मविश्वास वाढवणार आहे, ज्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत."

आमच्यासाठी गुंतवणूकदारांचे हित सर्वोपरि :

कंपनीच्या शेअरमध्ये अनपेक्षित चढ-उतार झाल्याचे अदानी यांनी सांगितले. "असाधारण परिस्थिती पाहता, कंपनीच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे की, FPO पुढे जाणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही,"

ते म्हणाले, ''आमच्यासाठी गुंतवणूकदारांचे हित सर्वोपरि आहे आणि त्यांना कोणत्याही संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी संचालक मंडळाने FPO मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.''

गेल्या आठवड्यात आलेल्या 'हिंडेनबर्ग रिसर्च'च्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. घसरणीचा हा ट्रेंड बुधवारीही कायम राहिला. गेल्या पाच व्यापार सत्रांमध्ये समूह कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 7 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT