Gautam Adani News esakal
अर्थविश्व

अदानी समूह 'NDTV' विकत घेणार? सुरुवातीला मिळवणार 29.18 टक्के शेअर्स

अदानी ग्रुपनं अधिकृत निवदेनातून दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद : देशातील आघाडीच्या अदानी ग्रुपनं NDTV मिडीया ग्रुपचे 29.18 टक्के शेअर्स विकत घेणार आहे. त्याचबरोबर आणखी २६ टक्के शेअर्स खरेदी करण्याची खुली ऑफरही कंपनीकडून देण्यात येणार आहे. अदानी ग्रुपनं आपल्या अधिकृत निवेदनात ही माहिती दिली.

अदानी ग्रुपनं आपल्या निवेदनात म्हटलं की, अदानी ग्रुपची उपकंपनी असलेली AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेड न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडमधील (NDTV) २९.१८ टक्के हिस्सा विकत घेणार आहे. तसेच उर्वरित २६ टक्के हिस्सा विकत घेण्याची ऑफरही अदानी ग्रुपनं एनडीटीव्हीला दिली आहे. यासाठी ४९३ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. ज्याच्या एका शेअरची किंमत २९४ रुपये असेल. या व्यवहारामुळं NDVTच्या शेअर्सनं शेअर बाजारात ५ टक्के उसळी मारलेली पहायला मिळाली. ज्यामुळं त्याची किंमत ३७६.५५ रुपयांवर पोहोचली.

AMNL ची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी VCPL कडं RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे वॉरंट आहे तसेच त्यांना RRPR मधील हिश्श्याचे 99.99 टक्के शअर्समध्ये रूपांतरित करण्याचा अधिकार आहे. VCPL ने RRPR मधील 99.5 टक्के शेअर्स मिळविण्यासाठी वॉरंटचा वापर केला आहे. अशा संपादनामुळे VCPL RRPR चं नियंत्रण मिळवेल. RRPR ही NDTV ची प्रवर्तक समूह कंपनी असून तिचा NDTV मध्ये 29.18 टक्के हिस्सा आहे," असंही निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, SEBI च्या (शेअर्स आणि टेकओव्हरचे महत्त्वपूर्ण अधिग्रहण) नियम, 2011 चे पालन करून अदानी समूहाच्या संस्था NDTV मधील 26 टक्क्यांपर्यंत भागभांडवल मिळविण्यासाठी एक खुली ऑफर सुरू करणार आहे. NDTV नं FY22 मध्ये 123 कोटी रुपये EBITDA आणि 85 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यासह 421 कोटी रुपयांच्या कमाईची नोंद केली आहे.

या व्यवहारावर एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेडचे सीईओ संजय पुगलिया म्हणाले, “हे संपादन AMNLच्या प्लॅटफॉर्मवर नव्या युगाच्या माध्यमांचा मार्ग प्रशस्त करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. AMNL कंपनी भारतीय नागरिक, ग्राहक तसेच भारतात रस असलेल्यांना माहिती आणि ज्ञानाने सक्षम करण्याचा प्रयत्न करते. बातम्यांमध्ये कंपनी अग्रस्थानी असून शैली आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये तीची मजबूत आणि वैविध्यपूर्ण पोहोच आहे, त्यामुळं NDTV हे सर्वात योग्य प्रसारण आणि डिजिटल व्यासपीठ ठरणार आहे"

AMNL किंवा AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेड ही अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे आणि अदानी समूहाचा मीडिया व्यवसाय आहे. AMNL ने अलीकडेच विकत घेतलेली VCPL ही तिची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT