Anil Ambani sakal
अर्थविश्व

कर्जबाजारी अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलची विभागणी; कंपनीचे चार भागात होणार विभाजन

रिलायन्स कॅपिटलच्या संचालकांनी कंपनीला चार मुख्य गुंतवणूक कंपन्यांमध्ये (सीआयसी) विभाजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कर्जबाजारी अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कॅपिटलबाबत मोठी बातमी समोर येत आहे. रिलायन्स कॅपिटलचे चार भागांत विभाजन केले जाऊ शकते, असे वृत्त आहे. कंपनीच्या संचालकांनी हा प्रस्ताव दिला आहे. खरेतर, रिलायन्स कॅपिटलच्या संचालकांनी कंपनीला चार मुख्य गुंतवणूक कंपन्यांमध्ये (सीआयसी) विभाजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे कंपनीची रचना पूर्णपणे बदलेल. आम्ही तुम्हाला सांगतो की रिलायन्स कॅपिटल दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. यासाठी गेल्या महिनाभरापासून शेअर्सचे व्यवहार बंद आहेत.

निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

कर्जबाजारी कंपनीसाठी निविदा प्रक्रिया आधीच अंतिम टप्प्यात आहे. रिलायन्स कॅपिटलचे जनरल इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी पिरामल, झुरिच, अॅडव्हेंट प्रायव्हेट इक्विटी आणि आदित्य बिर्ला कॅपिटल या चार कंपन्या यादीत आहेत.

आरबीआयकडून मागितली मंजुरी

रिलायन्स कॅपिटलच्या प्रशासकाने आरबीआयला (RBI) पत्र लिहून प्रस्तावावर त्यांचे मंजुरी मागितली आहे. सध्याच्या आरबीआयच्या (RBI) नियमांनुसार, एका कंपनीत एकापेक्षा जास्त CIC ला परवानगी नाही. त्यामुळे रिलायन्स कॅपिटल CIC पैकीचार CIC च्या पुनर्बांधणीसाठी आरबीआयच्या (RBI) मंजुरीची आवश्यकता असेल.

CIC म्हणजे काय?

आरबीआयच्या (RBI)  नियमांनुसार, CIC ही एक NBFC ( Non Banking Financial Companies) आहे. जी शेअर्स आणि सिक्युरिटीजच्या अधिग्रहणाच्या व्यवसायात गुंतलेली आहे. यामध्ये समूह कंपन्यांमधील निव्वळ मालमत्तेपैकी ९०  टक्के शेअर्स, बॉण्ड्स, डिबेंचर्स, डेबिट किंवा कर्जाच्या गुंतवणुकीच्या स्वरूपात आहेत. रिलायन्स कॅपिटलच्या जवळपास २० वित्तीय सेवा कंपन्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT