Aniruddha Rathi writes It time to pay taxes in advance esakal
अर्थविश्व

आली वेळ...आगाऊ कर भरण्याची!

सरकारकडे आधीच (ॲडव्हान्स) भरावा लागणारा प्राप्तिकर होय.

अनिरुद्ध राठी (चार्टर्ड अकाउंटंट)

असे सर्व करदाते, ज्यांचा देय प्राप्तिकर (टीडीएस आदी वजा केल्यानंतर), आर्थिक वर्षात रु. १०,००० पेक्षा अधिक येत असेल, तर आगाऊ प्राप्तिकर भरणे आवश्यक आहे.

आगाऊ कर अर्थात ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे सोप्या भाषेत चालू आर्थिक वर्षाचे अंदाजे उत्पन्न काढून त्यावरील देय प्राप्तिकर. सरकारकडे आधीच (ॲडव्हान्स) भरावा लागणारा प्राप्तिकर होय.

कोणी भरावा आगाऊ कर?

असे सर्व करदाते, ज्यांचा देय प्राप्तिकर (टीडीएस आदी वजा केल्यानंतर), आर्थिक वर्षात रु. १०,००० पेक्षा अधिक येत असेल, तर आगाऊ प्राप्तिकर भरणे आवश्यक आहे.

कोठे व कसा भरावा?

आगाऊ कर म्हणजे आपण भरत असलेला आपला प्राप्तिकरच असतो. तो फक्त आपण सरकारला ॲडव्हान्स म्हणजे आधीच देत असतो. म्हणूनच आगाऊ कर जमा करण्यासाठीची प्रक्रिया ही प्राप्तिकर जमा करण्यासारखीच असते. आगाऊ कर ऑफलाइन म्हणजेच बँकेत चलनाद्वारे किंवा ऑनलाइन सुद्धा भरता येतो. चलन क्र. २८० द्वारे आगाऊ प्राप्तिकराचा हप्ता भरता येतो.

इतर महत्त्वाच्या गोष्टी

असे ज्येष्ठ नागरिक (६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेले) ज्यांना कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक वा धंद्याचे उत्पन्न येत नाही, अशा व्यक्तींना आगाऊ कर भरण्याची गरज नाही.

जे करदाते अंदाजे उत्पन्न पद्धतीने कलम ४४एडी किंवा ४४एडी प्रमाणे उत्पन्न दाखवितात; अशा करदात्यांना १५ मार्चपूर्वी एका हप्त्यात संपूर्ण आगाऊ कर भरावा लागतो.

कोणत्याही भांडवली लाभ किंवा इतर अनपेक्षित अकस्मात असे कोणतेही उत्पन्न (जसे लॉटरी, बक्षीस आदी) प्राप्त झाल्यास, त्याच्या पुढील येणाऱ्या आगाऊ कराच्या देय हप्त्यामध्ये असे अनपेक्षित अथवा भांडवली नफा धरून कराची गणना करावी आणि मगच आगाऊ कर भरावा. असे उत्पन्न जर १५ मार्चनंतर प्राप्त झाल्यास त्यावरील संपूर्ण प्राप्तिकराची गणना करून तो ३१ मार्चपूर्वी सरकारखाती जमा करावा. ३१ मार्चपूर्वी जमा केलेला प्राप्तिकर हा आगाऊ कर म्हणूनच मानला जातो.

आगाऊ कर न भरल्यास...

अ) कलम २३४ ब नुसार ः जर आपण भरलेला आगाऊ कर हा एकूण देय प्राप्तिकराच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी भरला गेला असेल, तर कलम २३४ ब नुसार येणारे व्याज प्रत्येक महिन्याला १ टक्का असून, ते एक एप्रिलपासून ते प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करेपर्यंत भरावे लागेल.

ब) कलम २३४ सी नुसार ः आगाऊ कर हप्ता सोबतच्या तक्त्याप्रमाणे कमी भरला गेल्यास या कलमांतर्गत प्रत्येक महिन्याला १ टक्का व्याज भरावे लागेल.

तात्पर्य

बऱ्याच करदात्यांना आगाऊ कर भरावा लागत असतो. परंतु, त्या संबंधित माहिती आणि संभाव्य व्याजरुपी नुकसानाची त्यांना कल्पनाच नसते. हा लेख वाचल्यावर करदात्यांनी आवर्जून आगाऊ कर भरावा आणि दंडरूपी व्याज टाळावे! कारण आता वेळ आली आहे... आगाऊ कर भरायची!

आगाऊ कर भरायची देय तारीख देय कराच्या

१५ जून (अॅडव्हान्स टॅक्स पहिला हप्ता) १५ %

१५ सप्टेंबर (अॅडव्हान्स टॅक्स दुसरा हप्ता) ४५ %

१५ डिसेंबर (अॅडव्हान्स टॅक्स तिसरा हप्ता) ७५ %

१५ मार्च (अॅडव्हान्स टॅक्स चौथा हप्ता) १०० %

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT