https://www.youtube.com/watch?v=625HfM1A6ZEआगाऊ प्राप्तिकर अर्थात ॲडव्हान्स टॅक्स (ADVANCE TAX) म्हणजे सोप्या भाषेत चालू आर्थिक वर्षात अंदाजे उत्पन्न काढून त्यावरील देय प्राप्तिकर, सरकारला आधीच (ADVANCE) भरावा लागणारा प्राप्तिकर होय.
आगाऊ कर कोणी भरावा?
असे सर्व करदाते ज्यांचा देय प्राप्तिकर (टीडीएस इत्यादी वजा केल्यानंतर), आर्थिक वर्षात रु. १०,००० पेक्षा अधिक येत असेल, त्यांनी आगाऊ प्राप्तिकर भरणे आवश्यक आहे.
आगाऊ कर जमा कोठे करावा?
आगाऊ प्राप्तिकर जमा करण्यासाठीची प्रक्रिया ही प्राप्तिकर जमा करण्यासारखीच असते. तो ऑफलाइन म्हणजेच बँकेत चलन भरून किंवा ऑनलाइनसुद्धा भरता येतो. चलन क्र. २८० द्वारा आगाऊ प्राप्तिकर हप्ता भरू शकता.
आगाऊ प्राप्तिकर भरणा करायच्या तारखा
आगाऊ प्राप्तिकराची देय तारीख एकूण देय प्राप्तिकर
१५ जून (अॅडव्हान्स टॅक्स पहिला हप्ता) १५ टक्के
१५ सप्टेंबर (अॅडव्हान्स टॅक्स दुसरा हप्ता) ४५ टक्के
१५ डिसेंबर (अॅडव्हान्स टॅक्स तिसरा हप्ता) ७५ टक्के
१५ मार्च (अॅडव्हान्स टॅक्स चौथा शेवटचा हप्ता) १०० टक्के
इतर महत्त्वाच्या गोष्टी
असे ज्येष्ठ नागरिक (६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेले) ज्यांना कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक उत्पन्न मिळत नाही, अशा व्यक्तींना आगाऊ प्राप्तिकर भरण्याची गरज नाही.
जे करदाते अंदाजे उत्पन्न पद्धतीने कलम ‘४४ एडी’ किंवा ‘४४ एडीए’प्रमाणे उत्पन्न दाखवितात; अशा करदात्यांना १५ मार्चपूर्वी एक हप्त्यात संपूर्ण आगाऊ प्राप्तिकर भरावा लागतो.
कोणत्याही भांडवली लाभ किंवा इतर अनपेक्षित अकस्मात असे कोणतेही उत्पन्न (जसे लॉटरी, बक्षीस इत्यादी) प्राप्त झाल्यास, त्याच्या पुढील येणाऱ्या आगाऊ कराच्या देय हप्त्यामध्ये असे अनपेक्षित अथवा भांडवली नफा धरून कराची गणना करावी आणि मगच आगाऊ प्राप्तिकर भरावा. असे उत्पन्न १५ मार्चनंतर प्राप्त झाल्यास त्यावरील संपूर्ण प्राप्तिकराची गणना करून तो ३१ मार्चपूर्वी सरकार खाती जमा करावा. ३१ मार्चपूर्वी जमा केलेला प्राप्तिकर, हा आगाऊ प्राप्तिकर म्हणूनच मानला जातो.
आगाऊ कर न भरल्यास...
१) कलम ‘२३४ ब’ नुसार : आपण भरलेला आगाऊ प्राप्तिकर हा एकूण देय आयकराच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी भरला गेला असेल, तर कलम ‘२३४ ब’ नुसार येणारे व्याज प्रत्येक महिन्याला एक टक्का असून, तो एक एप्रिलपासून ते प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करेपर्यंत भरावा लागेल.
ब) कलम ‘२३४ सी’ नुसार : आगाऊ कर हप्ता वर दिलेल्या तक्त्यातील प्रमाणापेक्षा कमी भरला गेल्यास या कलम अंतर्गत प्रत्येक महिन्याला एक टक्का कमी व्याज भरावे लागेल.
तात्पर्य एवढेच, की बऱ्याच करदात्यांना आगाऊ प्राप्तिकर भरायची जबाबदारी असते. परंतु त्या संबंधित माहिती आणि संभावित व्याजरुपी नुकसानाची त्यांना कल्पनाच नसते. हा लेख वाचल्यावर करदात्यांनी आवर्जून आगाऊ प्राप्तिकर भरावा आणि देय व्याज टाळावा हीच सदिच्छा! सोबतच्या तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे पंधरा डिसेंबर ही आगाऊ प्राप्तिकराचा तिसरा हप्ता भरायची देयतारीख असून ती काही दिवसांवरच येत आहे. त्यामुळे, आगाऊ प्राप्तिकर भरायची वेळ अजूनही गेलेली नाही, असे म्हणायला हरकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.