sharemarket 
अर्थविश्व

शेअर मार्केट : अर्थसंकल्पानंतर तेजीचा बिगुल!

भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत करत ‘सेन्सेक्स’ने ५०,७३१ अंशावर, तर ‘निफ्टी’ने १४,९२४ अंशावर बंद भाव दिला. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी प्राप्तिकरात कोणताही विशेष बदल न करणे, तसेच पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ, या निराशेची बाजू असल्या, तरी असे म्हणतात, की ‘युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते’. कोरोना; तसेच लॉकडाउन हा काळ युद्धजन्य परिस्थितीसारखाच होता. देशाची वित्तीय तूट आणि एकूण देशांतर्गत उत्पादनाचे (जीडीपी) प्रस्थापित ग्राह्य मापदंड बाजूला ठेवत देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी अर्थसंकल्पात खर्चाचे प्रमाण वाढवून धाडसी पाऊल टाकले गेले आहे.

बाजारात तेजीचे संकेत
अर्थव्यवस्थेला पैशाच्या तेजीचा डोस देणारा अर्थसंकल्प, रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेले स्थिर व्याजदराचे पतधोरण आणि सकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार तेजीचा बिगुल वाजवत आहे. आलेखानुसार आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ४६,१६०, तर ‘निफ्टी’साठी १३,५९६ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. ‘सेन्सेक्स’ने ५०,१५३, तर ‘निफ्टी’ने १४,७५३ या अडथळा पातळीवर बंद भाव देऊन तेजीचे संकेत दिले आहेत. एकीकडे आलेखानुसार तेजीचे संकेत मिळत असताना दुसरीकडे बाजार मूलभूत विश्लेषणानुसार महाग झाल्याचे दिसत आहे. 

एचडीएफसी बँक व स्टेट बँकेकडे लक्ष
अर्थसंकल्पात बँकिंग क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींमुळे गेल्या आठवड्यात बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरनी जोरदार तेजी दर्शविली. बँकिंग क्षेत्रातील अनेक शेअर नवे उच्चांक गाठत आहेत. बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक ‘बँक निफ्टी’ने ३२,६१३ या पातळीच्या वर ३५,६५४ अंशांवर बंद भाव देऊन तेजीचे संकेत दिले आहेत. ‘बँक निफ्टी’ २६,६८६ या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीसाठी तेजीचा कल दर्शवीत आहे. आलेखानुसार, एचडीएफसी बँकेच्या शेअरने १५११ या पातळीच्या वर रु. १५९७ ला बंद भाव देत, तसेच स्टेट बँकेच्या शेअरने गेल्या आठवड्यात मोठी उडी मारत रु. ३७३ रुपयांच्या वर रु. ३९३ ला बंद भाव दिला आहे. आलेखानुसार, जोपर्यंत हा भाव रु. २६९ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत तेजीचे संकेत आहेत.

‘बँक बीज’ची खरेदी फायदेशीर
जे म्युच्युअल फंड ‘एक्स्चेंज’वर शेअरसारखे घेता-विकता येतात, त्यांना ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ (इटीएफ) म्हणतात. ‘निप्पॉन इंडिया बँक बीज’ अशाच प्रकारचा एक ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’ आहे, ज्या फंडाने बँकिंग क्षेत्रातील प्रामुख्याने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, स्टेट बँक आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. आगामी काळात बँकिंग क्षेत्रातील या दिग्गज शेअरनी तेजी दर्शविल्यास या फंडाची ‘नेट असेट व्हॅल्यू’ (एनएव्ही) वाढणे अपेक्षित आहे. आलेखानुसार, जोपर्यंत ‘बॅंक बीज’चा भाव रु. २९७ या ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीसाठी तेजीचा कल आहे. ‘बॅंक बीज’चा सध्याचा बाजारभाव रु. ३५९ आहे. ‘बॅंक बीज’मध्ये शेअरसारखी खरेदी-विक्री करता येते. बँकिंग क्षेत्रातील दिग्गज शेअर्सचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी मर्यादित प्रमाणात ‘बँक बीज’मध्ये खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.

मर्यादित गुंतवणूक करणे हितावह
आलेखानुसार तेजीचे संकेत देणाऱ्या; मात्र मूलभूत विश्लेषणानुसार महाग झालेल्या शेअर बाजारात सध्या दीर्घकालीन गुंतवणूक करताना मर्यादित प्रमाणात ‘बॅंक बीज’मध्ये; तसेच दुसरीकडे पडझड दर्शविलेल्या सोन्यातदेखील गुंतवणुकीची संधी ओळखून सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या ‘गोल्ड बीज’मध्ये (सध्याचा भाव ः रु. ४१) मर्यादित गुंतवणूक करणे हितावह ठरू शकेल. 

वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना बाजारातील जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT